Home /News /national /

Bihar Election: बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम, काय आहेत Guidelines

Bihar Election: बिहार निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम, काय आहेत Guidelines

नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल, असंही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं...

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Election 2020) बिगुल वाजला आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 28 ऑक्टोबरपासून तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. हेही वाचा...Bihar Election 2020: बिहारमध्ये 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान, 10 नोव्हेंबरला मतमोजणी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. कोरोना काळातील सर्वात मोठी निवडणूक बिहार राज्यात होत आहे. या निवडणुकीवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे जगातील 70 देशांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. बिहारमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य जपत लोकशाहीचा अधिकार वापरण्याची संधी देण्यात आली आहे. नवीन सुरक्षा नियमांच्या आधारावर विधानसभेची निवडणूक होईल, असंही सुनील अरोरा म्हणाले. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काही महत्वाच्या गाईडलाईन्सही दिल्या आहेत. एक तासानं मतदानाचा कालावधी वाढवला... बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी मतदानाचा हक्क बजवावा. मात्र, हा निर्णय नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर लागू होणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर ती थर्मल स्कॅनर लावण्यात येणार आहे. जवळपास 46 लाख मास्कचा वापर करण्यात येईल. सोबतच पीपीई वापर करण्यात येणार आहे. या आहेत महत्त्वाच्या गाईडलाईन्स... -प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक -निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन गाड्यांची परवानगी असणार आहे. -अर्ज भरण्यासाठी दोनच व्यक्ती सोबत ठेवू शकणार. घरोघरी प्रचारादरम्यान पाच लोकांच्या वर लोकं असू नयेत -सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील. -निवडणुकीसाठी 7 लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर 46 लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर 6 लाख पीपीई कीट, 6.5 लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे. हेही वाचा......तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या बंगल्यासमोर धनगरी ढोल वाजवणार- गोपीचंद पडळकर -एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान -कोरोनाबाधित रुग्ण जे क्वारंटाइन आहेत, त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदानाचा हक्क बजावता येईल. आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar, Voting in Bihar

    पुढील बातम्या