Bihar Election 2020 : निवडणुकीच्या जाहीरनामा येताच भाजपचे मंत्री Corona पॉझिटिव्ह; मोफत लशीचं आश्वासन

Bihar Election 2020 : निवडणुकीच्या जाहीरनामा येताच भाजपचे मंत्री Corona पॉझिटिव्ह; मोफत लशीचं आश्वासन

नुकतच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि RJD यांनी संकल्पपत्र जाहीर केलं.

  • Share this:

पाटणा, 22 ऑक्टोबर : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणापत्र जाहीर करताच भाजपला मोठा दणका मिळाला आहे. भाजपच्या मंत्र्याचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खऴबळ उडाली आहे. नुकतंच निर्मला सितारमण यांना भाजपचे 11 सूत्री संकल्पपत्र जाहीर केलं आणि त्यानंतर ही धक्कादायक बातमी येत आहे.

उपमुख्यमंत्री आणि भाजप पक्षाचे स्टार प्रचारक सुशील कुमार मोदी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुशील कुमार मोदी यांनी याची माहिती स्वत: ट्वीट करून दिली आहे. याआधी भाजपचे शाहनवाज हुसैन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुशील मोदी यांनी स्वत:ला क्वारंटाइन केल्याची माहिती ट्वीटरवरून दिली आहे. त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिऴावी आहे.

हे वाचा-प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत अभियान; महाराष्ट्र सरकार धडा घेणार का?

नुकतच बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि RJD यांनी संकल्पपत्र जाहीर केलं. महिलांना आत्मनिर्भर, सत्तेत आल्यावर कोरोनाची मोफत लस, 19 लाख नोकऱ्या देण्यावर भाजपने या संकल्पपत्रात भर दिला आहे. बिहारमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने संकल्पपत्रात 11 मोठ्या घोषणा केल्या आहेत. 5 सूत्र एक लक्ष्य असं या संकल्पपत्रात भाजपने म्हटलं आहे.

बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपनं जाहीर केलेल्या संकल्प पत्रात काय म्हटलं आहे?

1. बिहारमधील जनतेला सत्तेत आल्यानंतर मोफत लस देणार

2. मेडिकल आणि इंजिनियरिंगचं शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करून देणार

3. बिहारमध्ये 3 लाख शिक्षक भर्ती करणार

4. IT क्षेत्रात 5 वर्षात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यावर भर

5. एक कोटी महिलांना आत्मनिर्भर कऱण्याचं लक्ष्य

6. एक लाख लोकांना आरोग्य विभागात नोकरी. 2024 पर्यंत दरभंगा इथे एम्स रुग्णालय सुरू करणार

7. धान आणि गहू नंतर डाळीची खरेदीही एमएसपी दराने.

8. 30 लाख लोकांना 2022 पर्यंत पक्की घर देण्याचं वचन

9. 2 वर्षांत 15 नव्या प्रोसेसिंग उद्योगांना चालना देणार

10. 2 वर्षांत मत्स उत्पादनाला मोठ्या प्रमाणात चालना देणार

11. शेतकरी उत्पादन संघांसाठी सप्लाय चेन तयार करणार ज्यातून 10 हजार रोजगार तयार होतील.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 22, 2020, 3:15 PM IST
Tags: BJP

ताज्या बातम्या