पाटना 17 ऑगस्ट: राजकारणी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कहाण्या या कायम चर्चेत असतात. अशाच एका घटनेने बिहारमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या बहिणीने रागाच्या भरात एका रेशन दुकानदाराचाच चावा घेतल्याची घटना घडली आहे. रेखा मोदी असं त्यांच नाव आहे. रेखा यांनी एका स्थानिक दुकानदाराकडून दोन पोती तांदूळ विकत घेतला. आणि त्यांना ती पोती घरी आणून देण्यास सांगितलं.
त्यानंतर त्या दुकानदाराने तो माल काही घरी आणूनच दिला नाही. त्यामुळे रेखा या त्या दुकानदाराकडे गेल्या आणि ही घटना घडली. ‘जनत्ता’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
तांदुळ घरी का आणून दिला नाही असा सवाल त्यांनी दुकानदाराला केला तेव्हा त्यांने काही समाधानकारक उत्तर दिलं नाही असं त्यांनी सांगितलं. नंतर त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. नंतर त्यांच्यात भांडण झालं आणि भांडणामुळे रागाने रेखा यांनी दुकानदाराच्या हाताचा चावा घेतला.
‘कोरोना’मुळे वडिलांचा मृत्यू, अंत्यसंस्कारास मुलाचा नकार; डोळ्याला लागतील धारा
शेवटी प्रकरण पोलिसांमध्ये गेलं. पोलीस स्टेशनला गेल्यावरही रेखा मोदी यांनी प्रचंड गोंधळ घातला. जमीनीवर झोपून त्यांनी न्याय देण्याची मागणी केली. शेवटी पोलिसांनी दुकानदाराला रेखा यांचे पैसे परत करण्याचे आदेश दिलेत.
महाराष्ट्रापेक्षा कमी असलेल्या या राज्याने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला
त्यानंतर हे प्रकरण शांत झालं आहे. रेखा मोदी यांच्यामुळे या आधीही वाद झाले आहेत. रेखा मोदी या आपली बहिण नाहीत, त्यांचा आपल्या कुटुंबीयांशी काहीही संबंध नाही असं सुशील कुमार मोदी यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushil Kumar Modi