बिहारमध्ये 'चमकी'चं थैमान, मुलांच्या मृत्यूची संख्या 130वर

चमकी या तापाचं नेमकं कारण अजुन कळालेलं नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये गरीब कुटुंबातल्या मुलांचा समावेश आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2019 07:00 PM IST

बिहारमध्ये 'चमकी'चं थैमान, मुलांच्या मृत्यूची संख्या 130वर

पाटना, 23 जून : बिहारमध्ये 'चमकी' या तापाने मुझफ्फर जिल्ह्यात थैमान घातलंय. गेल्या दोन महिन्यात या तापाने 130 मुलांचा मृत्यू झालाय. या तापाचं नेमकं कारण अजुन कळालेलं नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये गरीब कुटुंबातल्या मुलांचा समावेश आहे. रक्तातली साखर कमी झाल्याने मुलांची प्रतिकार शक्ती कमी होत आणि त्यांना आजाराने ग्रासलं जातं असं डॉक्टरांनी सांगितलं. यावरून राजकारणही सुरू झालं असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केलीय.

Acute Encephalitis Syndrome (AES) असं या तापाला म्हटलं जातं. लहान मुलांना या तापाची लागण होते आणि त्यांची तब्ब्येत झापाट्याने खालावते आणि ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. या तापाच्या प्रकोपाने बिहार हादरून गेलंय. सरकार या तापाला आटोक्यात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचा दावा करतंय. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय.

गेल्या काही दिवसांपासून या तापाने डोकं वर काढल्याने मुझफ्परपूरची चर्चा सर्व देशभर होतेय. जिल्ह्यातल्या सर्व सरकारी दवाखाने भरले असून उपचारासाठी डॉक्टरांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आलीय. सर्वच दवाखाण्यामध्ये दररोज आजारी मुलांचं येणं सुरूच आहे. लिचीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात दरवरर्षी शेकडो मुलं या प्रकारच्या आजाराने बळी पडतात मात्र त्यावर अजुन उपाय सरकारला शोधता आला नाही.

कुपोषीत मुलांनी लिची खाल्ल्यामुळे हा आजार होते अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. कुपोषीत मुलांनी उपोषीपोटी लीची खाल्लीतर त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण झापाट्याने खाली जातं आणि ते आजारी पडतात असं म्हटलं जातं. मात्र डॉक्टरांनी याचं नेमकं कारण काय आहे हे अजुन स्पष्ट केलेलं नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज मुझफ्फरपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2019 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close