बिहारमध्ये 'चमकी' तापाचं थैमान, मुलांच्या मृत्यूची संख्या 125वर

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजुन मुझफ्फरपूरला भेट दिली नाही अशी टीका करण्यात येतेय. तर दौऱ्यापेक्षा उपचार महत्त्वाचे असं सरकारकडून म्हटलं जातंय.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 02:58 PM IST

बिहारमध्ये 'चमकी' तापाचं थैमान, मुलांच्या मृत्यूची संख्या 125वर

पाटणा 16 जून : बिहारच्या मुझप्फरपूर जिल्ह्यात 'चमकी' या तापाने थैमान घातलंय. या तापाने मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची संख्या 125 वर गेली आहे. अजुनही हा ताप आटोक्यात आला नसून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय. अॅक्युट इंसेफलाइटिस सिंड्रोम (AES) असं या तापाला म्हटलं जातं. लहान मुलांना या तापाची लागण होते आणि त्यांची तब्ब्येत झापाट्याने खालावते आणि ते मृत्यूच्या दाढेत ओढले जातात. या तापाच्या प्रकोपाने बिहार हादरून गेलंय. सरकार या तापाला आटोक्यात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचा दावा करतंय. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने गंभीर चिंता व्यक्त करण्यात येतेय.

गेल्या काही दिवसांपासून या तापाने डोकं वर काढल्याने मुझफ्परपूरची चर्चा सर्व देशभर होतेय. जिल्ह्यातल्या सर्व सरकारी दवाखाने भरले असून उपचारासाठी डॉक्टरांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आलीय. सर्वच दवाखाण्यामध्ये दररोज आजारी मुलांचं येणं सुरूच आहे. लिचीसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यात दरवरर्षी शेकडो मुलं या प्रकारच्या आजाराने बळी पडतात मात्र त्यावर अजुन उपाय सरकारला शोधता आला नाही.

कुपोषीत मुलांनी लिची खाल्ल्यामुळे हा आजार होते अशीही शंका व्यक्त करण्यात येत आहे. कुपोषीत मुलांनी उपोषीपोटी लीची खाल्लीतर त्यांच्या रक्तातल्या साखरेचं प्रमाण झापाट्याने खाली जातं आणि ते आजारी पडतात असं म्हटलं जातं. मात्र डॉक्टरांनी याचं नेमकं कारण काय आहे हे अजुन स्पष्ट केलेलं नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आज मुझफ्फरपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकतीच इथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ते दवाखाण्यात असतानाच त्याच  दोन मुलांचा मृत्यू झाला. पीडित कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदतही जाहीर केलीय. मात्र केवळ मदत जाहीर करून आणि थातूरमातूर उपया करून अश घटना थांबणार नाहीत तर त्यावर कायम स्वरुपी आणि दिर्घकालीन उपाय करावे लागतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

यावर आता राजकारण सुरू झालंय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अजुन मुझफ्फरपूरला भेट दिली नाही अशी टीका विरोधकांनी सुरू केलीय. तर मुख्यमंत्र्यांनी भेट देण्यापेक्षा आजारी मुलांवर उपचार करणं महत्त्वाचं असल्याचं बिहारचे मंत्री शाम रजक यांनी म्हटलं आहे. मुझफ्फरपूरशिवाय इतर जिल्ह्यांमध्येही या तापचं लोण पसरत असल्याचं आढळून आलंय.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 17, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...