पटना, 29 ऑक्टोबर : बिहारच्या औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घरातील सिलेंडर फुटल्याने मोठा स्फोट झाला. दरम्यान या झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे 30 हून अधिक जण जळाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहागंज परिसरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये आज पहाटे अडीचच्या सुमारास परिसरातील अनिल गोस्वामी यांच्या घरी छठ पुजेचा कार्यक्रम सुरू होता. घरातील सर्व सदस्य प्रसाद बनवण्यात व्यस्त होते. यादरम्यान घरातील सिलिंडरला आग लागली. त्यामुळे गॅस गळती होऊन आग वेगाने पसरली. यानंतर चेंगराचेंगरी झाली. काही लोकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. पण आग आणखीनच वाढत गेली.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस व अग्निशमन दलाला स्थानिकांनी याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. पण हळूहळू आग वाढत गेली आणि अचानक घराचा स्फोट झाला.
हे ही वाचा : उड्डाण करतानाच इंडिगो विमानाच्या इंजिनला आग, दिल्ली विमानतळावरील Shocking Video
ज्यामध्ये 30 हून अधिक लोक होरपळले असून गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर सर्व जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले परंतु हॉस्पिटलमध्ये नागरिकांची गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
घटनास्थळी बचावकार्य करताना पोलीस ही जखमी झाले होते. यामध्ये महिला कॉन्स्टेबल प्रीती कुमारी, अखिलेश कुमार, जगलाल प्रसाद, सैफ जवान मुकुंद राव, जगलाल प्रसाद, ड्रायव्हर मोज्जम आणि शहागंज, नगर परिषदेचे अध्यक्ष अनिल ओडिया, पंकज वर्मा, राजीव कुमार, मोहम्मद शबदीर आदींचा समावेश आहे.
मोहम्मद अस्लम, सुदर्शन, एरियन गोस्वामी, मोहम्मद छोटू आलम, अनिल कुमार, शाहनवाज यांच्यासह 30 जण जखमी झाले. त्यापैकी सुमारे 25 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांना खासगी नर्सिंग होममध्येही दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : अवघे 7 सेकंद अन् थेट कोमात पोहोचला तरुण; मुंबईतील रस्त्यावरील थरारक घटनेचा CCTV Video
घरमालक अनिल गोस्वामी यांनी सांगितले की, घरात छठ उत्सव सुरू होता. सर्व कुटुंब प्रसाद बनवण्यात मग्न होते. त्यानंतर गॅस गळतीमुळे आग लागली. कुटुंबीयांनी आरडाओरडा सुरू केल्यावर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस व अग्निशमन दलाला माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक आल्यावर लोकांनी आग विझवण्यास सुरुवात केली. तोपर्यंत आगीची तीव्रता वाढली होती. त्यामुळे घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. 30 हून अधिक लोक भाजून जखमी झाले. या घटनेनंतर रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांवर डॉक्टरांनी उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, Bihar