नालंदा, 19 मार्च: बिहारमधील (Bihar) नालंदा जिल्ह्यातून (Nalanda district) मोठी बातमी समोर येत आहे. हातगाडी चालकावर अॅसिड टाकून जिवंत जाळल्याचा प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील हिलसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नदाहा नादवार गावात ही घटना घडली आहे. आरोपींनी घरातून बोलावून हातगाडी चालकावर अॅसिड (Acid) टाकलं आणि त्याला जिवंत जाळलं. यात हातगाडी चालकाचा मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हातगाडी चालक ब्रजेश राम हा होळीनिमित्त घरी आला होता. शुक्रवारी संध्याकाळी गावातील काही लोकांनी त्याला घरातून बोलावून घेऊन गेले. त्यानंतर त्याच्यावर अॅसिड टाकून त्याला जिवंत जाळलं आणि त्याची हत्या केली.
ठरलं मग..! 'या' दिवशी घेणार योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ
घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक सुरू केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरु केला. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांनाही लक्ष्य करत जोरदार दगडफेक केली. या दगडफेकीत एका कॉन्स्टेबलसह अनेक पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ चार राऊंड हवेत गोळीबार केला.
मिळालेल्या माहितीनुसार, नदाहा नादवार येथील रहिवासी व्रजेश राम पाटणा येथे हातगाडीचे काम करायचे. होळीच्या निमित्तानं तो घरी आला होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याला गावातील काही लोकांनी घरातून नेलं आणि अॅसिड ओतून जिवंत जाळलं.
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे. गावात पोलीस तळ ठोकून आहेत. आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. डीएसपी कृष्णा मुरारी यांनी सांगितलं की, घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. सध्या सर्व आरोपी घर सोडून फरार झाले आहेत. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.