मराठी बातम्या /बातम्या /देश /

दारुड्या पित्याचं भयानक कृत्य, 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत; धक्कादायक कारण आलं समोर

दारुड्या पित्याचं भयानक कृत्य, 13 महिन्याच्या मुलाला फेकलं नदीत; धक्कादायक कारण आलं समोर

एका मद्यपी पित्यानं आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत (Thrown Into A River)  फेकून दिलंय.

एका मद्यपी पित्यानं आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत (Thrown Into A River) फेकून दिलंय.

एका मद्यपी पित्यानं आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत (Thrown Into A River) फेकून दिलंय.

  • Published by:  Pooja Vichare

बिहार, 20 डिसेंबर: बिहारच्या (Bihar) बेगूसराय (Begusarai district) जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका मद्यपी पित्यानं आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत (Thrown Into A River) फेकून दिलंय.भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बनवारीपूर गावात एका निर्दयी पित्यानं आपल्या निष्पाप बाळाची हत्या केली आहे.

मनीष कुमार नावाच्या व्यक्तीने त्याच्या 13 महिन्यांचा निष्पाप बाळ शिवमला बलान नदीत फेकून दिलं. त्यानंतर त्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे.

हेही वाचा- विध्वंस! राय चक्रीवादळात तब्बल 208 जणांचा मृत्यू, अन्नपाण्यासाठी लोकांचा संघर्ष 

13 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. एखाद्या व्यक्तीनं आपल्याच मुलाची हत्या केली यावर लोकांचा विश्वास बसत नाही आहे. 13 महिन्यांच्या लहान बाळाला नदीत फेकताना कदाचित राक्षसालाही दया आली असती, पण बाप का आला नाही. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली. पोस्टमॉर्टमनंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

माहेरी जाण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद

या घटनेबाबत सांगितलं जात आहे की, बनवारी पूर गावातील रहिवासी मनीष चौरसिया यांचा पत्नी कांचन देवीसोबत तिच्या माहेरी जाण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपी बारानं रागात आपल्या 13 महिन्याचा मुलगा शिवम कुमारला घराजवळ असलेल्या बलान नदीमध्ये फेकून दिलं. त्यात पाण्यात बुडून शिवमचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी वडील मनीष चौरसियाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

रविवार संध्याकाळी घडली घटना

मुलाची आई कांचन देवी यांनी सांगितलं की, रविवारी संध्याकाळी ती तिच्या माहेरी जाण्याच्या तयारीत होती. यानंतर दारूच्या नशेत तेथे पोहोचलेल्या पतीने तिला जाण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर तिचा पती रागावला आणि मुलासह निघून गेला. काही वेळाने तिने पतीला मुलाबद्दल विचारले असता, तो बोटीवर फिरत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर बोटीवर शोध घेऊनही शिवम कुठेच सापडला नाही, तेव्हा संशय आला. यानंतर आजूबाजूच्या लोकांसह मुलाचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. नंतर लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

आरोपीकडून गुन्हा कबूल

पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. त्यानंतर कठोर चौकशी केली असता त्याने मुलाला नदीत फेकून दिल्याचं सांगितले. आरोपी आणि कांचन देवी यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याच्यापासून त्यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचे वय पाच वर्षे, दुसऱ्याचं 13 महिने आणि एका मुलाचे वय तीन महिने असं आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news