इंजिनिअरने घेतली एवढी लाच ! नोटा मोजण्यासाठी मागवावं लागलं यंत्र

इंजिनिअरने घेतली एवढी लाच ! नोटा मोजण्यासाठी मागवावं लागलं यंत्र

बिहारची राजधानी पाटण्यामध्ये एका इंजिनिअरला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. हा लाचखोर इंजिनिअर अक्षरश: पैशाच्या ढिगाऱ्यावर बसला होता. त्याने लाचेतून एवढी रक्कम जमवली होती की ते पैसे मोजण्यासाठी नोटा मोजण्याचं यंत्र मागवावं लागलं.

  • Share this:

पाटणा, 8 जून : बिहारची राजधानी पाटण्यामध्ये एका इंजिनिअरला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. हा लाचखोर इंजिनिअर अक्षरश: पैशाच्या ढिगाऱ्यावर बसला होता. त्याने लाचेतून एवढी रक्कम जमवली होती की ते पैसे मोजण्यासाठी नोटा मोजण्याचं यंत्र मागवावं लागलं.

पाटण्याचा सुरेश प्रसाद यादव हा इंजिनिअर रस्तेबांधणी विभागात काम करतो. या इंजिनिअरला एक कॉन्ट्रॅक्टर अखिलेश कुमार जयस्वाल याने 14 लाख रुपयांची लाच पाठवली होती. या इंजिनिअरला पकडल्यानंतर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या घरावर छापे मारले. या छाप्यात दीड कोटी रुपयांची रक्कम मिळाली. या इंजिनिअरला आता चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

पैसे, दागिने, मालमत्ता

या इंजिनिअरकडे सुमारे दोन कोटी रुपयांची रोकड, दागिने आणि जमिनीची कागदपत्रंही मिळाली. त्याने एवढी संपत्ती जमा केली होती की पैसे मोजण्यासाठी मशीन मागवावं लागलं. बिहारमध्ये बिहटा भागात रस्ता तयार करण्याचं टेंडर निघालं होतं. या टेंडरसाठी ठेकेदार अखिलेशकुमार जयस्वाल याने अर्ज केला होता. पण टेंडर मंजूर करण्यासाठी इंजिनिअर सुरेशप्रसाद यादव याने या ठेकेदाराकडे 32 लाख रुपये मागितले.

भ्रष्टाचाराच्या रॅकेटचा पर्दाफाश

इंजिनिअर सुरेश प्रसाद यादव आणि ठेकेदार अखिलेशकुमार जयस्वाल यांच्यामध्ये 28 लाखांचा सौदा ठरला होता. आधीची रक्कम म्हणून ठेकेदाराने इंजिनिअरला 14 लाख रुपये पाठवले होते. तेव्हाच त्याला पकडण्यात आलं.

या इंजिनिअरला पकडल्यामुळे बिहारमध्ये रस्तेबांधणी भ्रष्टाचारात करणाऱ्यांचं मोठं रॅकेट उघडं पडलं आहे.

लाखोंची लाचखोरी

या इंजिनिअरकडे एवढे पैसे सापडले म्हणजे त्याने आधी किती प्रमाणात भ्रष्टाचार केला असेल याची कल्पना होते. अनेक ठेकेदारांकडून तो अशी लाखो रुपयांची लाच गोळा करत होता.

=========================================================================================

VIDEO : मन्नत पूर्ण, आदित्य ठाकरे पोहोचले अजमेरच्या दर्ग्यात!

First published: June 8, 2019, 5:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading