Home /News /national /

COVID-19 : मोठी बातमी! उद्यापासून 'या' राज्यात बंद होणार सर्व क्वारंटाइन सेंटर्स

COVID-19 : मोठी बातमी! उद्यापासून 'या' राज्यात बंद होणार सर्व क्वारंटाइन सेंटर्स

बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाबाधित वाढू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले 'या' राज्यातील क्वारंटाइन सेंटर्स सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे.

    पटना, 14 जून : भारतामध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतनाच बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाबाधित वाढू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले क्वारंटाइन सेंटर्स सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे. बिहारमध्ये 15 हजारांहून अधिक क्वारंटाइन सेंटर्स 29 एप्रिलपासून सुरू करण्यात आले होते. 15 लाखापेक्षा अधिक नागरिकांना या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातून बिहारमध्ये जाणाऱ्या मजुरांची संख्या देखील मोठी होती. क्वारंटाइन सेंटर बंद करण्यात येणार असल्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने 31 मे रोजी आदेश जारी केला होता. 15 जूनपासून क्वारंटाइन सेंटर बंद करण्यात येतील असे आदेश देण्यात आले होते. श्रमिक स्पेशल ट्रेन्स वगळता अन्य ट्रेन्सने राज्यात येणाऱ्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये न ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. (हे वाचा-ट्रम्प यांनी निभावलं मोदींना दिलेलं वचन, कोरोनाच्या लढ्यात भारताला केली मोठी मदत) अशी माहिती मिळते आहे की, राज्यामध्ये परतणारे सर्वाधिक मजूर बिहारमध्ये पोहोचले आहेत. जे शिल्लक आहेत ते थोड्या दिवसांमध्ये येतील. त्यामुळे सध्या क्वारंटाइन सेंटरची आवश्यकता नाही आहे. काही दिवसांनी राज्यात परतणाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. देशातील 11 शहरांमधून येणाऱ्यांना क्वारंटाइन सेंटर्समध्ये ठेवण्याचा निर्णय 21 मे रोजी घेण्यात आला होता. यामध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, कोलकाता, दिल्ली, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरूग्राम, नोएडा, कोलकाता या शहरांचा समावेश होता. बाकी शहरांमधून येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून न आल्यास त्यांना होम क्वारंटाइन करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले होते. मात्र 31 मे रोजी या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार श्रमिक स्पेशल ट्रेन्स वगळता अन्य ट्रेन्सने राज्यात येणाऱ्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये न ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात सोने कर्ज ठरेल सोयीचं, बँक आणि ग्राहकांना होणार फायदा) शनिवारपर्यंत राज्यातील क्वारंटाइन सेंटरमध्ये 20 हजार लोकं होती. उद्यापासून त्यांना होम क्वारंटाइनसाठी पाठवण्यात येणार आहे. होम क्वारंटाइनसाठी देखील राज्याकडून काही नियम आखण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या सर्वांना त्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Lockdown

    पुढील बातम्या