महाराष्ट्रापेक्षा कमी रुग्ण असलेल्या या राज्याने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

महाराष्ट्रापेक्षा कमी रुग्ण असलेल्या या राज्याने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

महाराष्ट्रात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अजूनही दीड लाखांवर आहे.

  • Share this:

पाटणा, 17 ऑगस्ट : Coronavirus चं संकट दूर व्हायचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या अजूनही दीड लाखांवर आहे. तरीही अनलॉक (Unlock) आणि Mission begin again अंतर्गत बहुतेक सर्व व्यवहार खुले करण्यात आले आहेत. दुसरीकडे बिहार (Bihar lockdown extension) सरकारने मात्र 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) वाढवायचा निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

देशभराचा विचार केला तर कोरोनाव्हायरस (Covid-19) चा प्रभाव सर्वाधिक असणाऱ्या पहिल्या 10 राज्यांमध्ये बिहार येतं. हे राज्य रुग्ण्संख्येच्या तुलनेत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थातच महाराष्ट्र आहे. बिहारमध्ये कोरोनारुग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे आहे. त्यातले 17 ऑगस्टच्या सकाळच्या आकडेवारीनुसार,  31059 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,58,705 आहे. एकूण रुग्णसंख्या तर सहा लाखांच्या जवळ पोहोचते आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने मात्र कडक उपाययोजना करत अद्याप सर्व व्यवहार खुले करण्यास नकार दिला आहे. बिहारमध्ये काही अटींवर दुकानं उघडायला परवानगी दिलेली असली, तरी शॉपिंग मॉल, थिएटर आदी बंदच आहेत.

बिहारमध्ये प्रार्थनास्थळं, मंदिरंसुद्धा इतक्यात उघडणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. रेस्टॉरंटमध्येही फक्त होम डिलिव्हरीची सेवा असेल. किमान 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा नितीश कुमार सरकारचा निर्णय आहे.

कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होईल, असं सांगण्यात आलं आहे. खासगी कार्यालयांमध्ये आणि कचेऱ्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असाही नियम करण्यात आला आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 17, 2020, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading