'लोक काँग्रेस पक्षाला पाकिस्तानचा एजंट म्हणतात'

काँग्रेस पक्षाला लोक पाकिस्तानचा एजंट म्हणतात, असे सांगत काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने चक्क पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 9, 2019 10:35 PM IST

'लोक काँग्रेस पक्षाला पाकिस्तानचा एजंट म्हणतात'

पाटणा, 09 मार्च: काँग्रेस पक्षाला लोक पाकिस्तानचा एजंट म्हणतात, असे सांगत काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने चक्क पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथे केलेल्या एअर स्टाईकनंतर काँग्रेसने किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा मागितला होता. पक्षाची ही मागणी चुकीची असल्याचे सांगत बिहार काँग्रेसचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी पक्षाला रामराम केला आहे.

भारतीय हवाई दलाने बॉम्ब टाकल्यानंतर 70 फूट खड्डे पडले असतील तेथे आगीचा गोळा निर्माण झाला असताना एखादा तरी दहशतवादी कसा काय शिल्लक राहील. पण हा मुद्दा वारंवार उपस्थित करून केले जाणारे राजकारण मला आवडले नाही, असे शर्मा यांनी सांगितले.

राहुल गांधींना लिहले पत्र...

गेल्या 30 वर्षापासून काँग्रेसमध्ये असलेल्या शर्मा यांनी पक्ष सोडण्याआधी अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहले. विशेष म्हणजे शर्मा यांनी याआधी देखील राहुल गांधी यांना अनेक पत्र लिहली आहेत. शर्मा यांच्या मते काँग्रेस कार्यकर्त्यांना असे वाटते की पक्षाने अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत.


Loading...

VIDEO : कुणी शिव्या घातल्या तर घराबाहेर काढून मारा, राज ठाकरेंचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2019 10:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...