Home /News /national /

बिहार निकालांवर नितीश कुमारांनी सोडलं मौन, पंतप्रधान मोदींबद्दल व्यक्त केली भावना

बिहार निकालांवर नितीश कुमारांनी सोडलं मौन, पंतप्रधान मोदींबद्दल व्यक्त केली भावना

Muzaffarpur: Prime Minister Narendra Modi and Bihar Chief Minister Nitish Kumar wave at party supporters during an election rally, ahead of the Lok Sabha polls in Muzaffarpur, Tuesday, April 30, 2019. (PTI Photo)(PTI4_30_2019_000026B)

Muzaffarpur: Prime Minister Narendra Modi and Bihar Chief Minister Nitish Kumar wave at party supporters during an election rally, ahead of the Lok Sabha polls in Muzaffarpur, Tuesday, April 30, 2019. (PTI Photo)(PTI4_30_2019_000026B)

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारचा विकास होईल असं सांगत पंतप्रधानांनी सर्वच चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

    नवी दिल्ली 11 नोव्हेंबर: बिहार विधान निवडणुकीचे निकाल लागून 24 तास झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जनता दल युनायटेडची कामगिरी समाधानकारक न झाल्याने ते काय प्रतिक्रिया देतील याबद्दल उत्सुकता होती. नितीश कुमार यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्यात. जनता मालिक है असं म्हणत NDAला बहुमत दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे सहकार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर NDAला बहुमत मिळालं आहे.  NDAने बहुमताक्षाही जास्त 125 जागा जिंकल्या.  तर महाआघाडीने 110 जागा जिंकल्या आहेत. बिहारमध्ये यशानंतर भाजपने (Bihar Assembly Election result) बुधवारी दिल्लीतल्या मुख्यालयात मोठा जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणुकींमध्येही भाजपला मोठं यश मिळालं आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. दोन जागांवरून भाजपचं कमळ देशभर फुललंय. जे विकासाच्या मुद्यावरून भरकटले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारचा विकास होईल असं सांगत पंतप्रधानांनी सर्वच चर्चेला पूर्णविराम दिला. काही पक्ष हे फक्त कुटुंबांपुरतेच मर्यादीत आहेत अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांची नावे न घेता केली. तरुणांनी भाजपसोबत येत देशाच्या विकासात सहभागी व्हावं असंही ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांनाच लोक निवडून देतील. आता विकास हाच मुद्दा यापुढे राहिल हाच या निकालांचा अर्थ आहे असं मोदी म्हणाले. जे विकासापासून दूर जातील त्यांचं लोकांनी डिपॉझिट जप्त केलं असा टोलाही त्यांनी लगावला. देशातल्या सगळ्यांचा भरवसा हा आता फक्त भाजपवरच आहे असंही पंतप्रधान म्हणाले.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Narendra modi, Nitish kumar

    पुढील बातम्या