'पॉर्न साईट्स बंद करा', नेत्याने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

'पॉर्न साईट्स बंद करा', नेत्याने पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

इंटरनेटवर असेलल्या पॉर्न साइट आणि अश्लील मजुकरावर बंदी घालण्यात यावी अशी मगाणी करणारे पत्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लिहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : इंटरनेटवर असेलल्या पॉर्न साइट आणि अश्लील मजुकरावर बंदी घालण्यात यावी अशी मगाणी संयुक्त जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिलांवर सामूहिक बलात्कार, हत्या या सारख्या घटना घडल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचंही नमूद कऱण्यात आलं आहे. अशा घटनांसाठी पॉर्न साइट कारणीभूत असल्याचं वक्तव्य नितीश कुमार यांनी याआधी केलं होतं.

नितीश कुमार यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक राज्यांत अशा घटना घडत आहेत. हे अत्यंत वेदनादायी असून चिंताजनक आहे. इंटरनेट सहजपणे उपलब्ध असून मुलांच्या हातात आहे. मुलं आणि युवक इंटरनेटवर अश्लील साहित्य तसेच हिंसक गोष्टी मोठ्या प्रमाणावर बघत आहेत. याचा प्रभाव पडल्यानंच अशा घटना घडतात असं नितिश कुमार यांनी म्हटलं आहे.

अनेकदा मारहाण किंवा गुन्हेगारी कृत्यांचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला जातो. याचा परिणाम अल्पवयीनांवर किंवा युवकांवर होत असतो. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यातही तरतुदी आहेत. मात्र त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचं नितीश कुमार यांनी पत्रात म्हटलं आहे.

Published by: Suraj Yadav
First published: December 18, 2019, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading