News 18 Exclusive - 'नितीश कुमार डायनासोरसारखे, येत्या काही दिवसांत ते पक्षासहीत गायब होतील'

News 18 Exclusive - 'नितीश कुमार डायनासोरसारखे, येत्या काही दिवसांत ते पक्षासहीत गायब होतील'

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांच्यासोबत झालेल्या खास बातचितमध्ये तेजस्वी यादव यांनी नितीन कुमार यांचा उल्लेख 'डायनासोर' असा केला. 'नितीश कुमार हे डायनासोरप्रमाणे आहेत.  येत्या काही दिवसांत ते आणि त्यांचा पक्ष गायब होईल', अशी खोचक टीकादेखील त्यांनी केली आहे.

तसंच यंदाच्या निवडणुकीत आम्ही सर्वच्या सर्व 40 जागा जिंकणार, असा दावादेखील तेजस्वी यांनी केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, 'पोटनिवडणुकीदरम्यान आम्ही प्रभाव नसलेल्या जागादेखील जिंकल्या'.

महाआघाडीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तेजस्वी यादव म्हणाले की, 'एकाच व्यासपीठावर येण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. सर्व ठिकाणी महाआघाडी झाली आहे, मात्र राष्ट्रीय स्तरावर होऊ शकली नाही. निवडणुकीपूर्वी एकत्र आलो नसलो तरीही निवडणुकीनंतर एकत्र येऊ'.

दरम्यान,निकालानंतर तुमचा नेता कोण असेल? असे विचारलं असता तेजस्वी यादव यांनी उलटच प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, 'भाजपनं कित्येक राज्यांमध्ये आपल्या नेत्याचं नाव घोषित केलं होतं का?'

वाचा अन्य बातम्या

SPECIAL REPORT: एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात कोण सरस?

VIDEO: 'हिंदू राष्ट्र बनाना है, हे वाचून मनाला वेदना होतात'

SPECIAL REPORT: 'मोदी साहेब हे वागणं बरं नव्हं'

VIDEO: रामनवमीच्या कार्यक्रमात राऊत म्हणतात; 'भाड में गया कानून, भाड में गई आचारसंहिता'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 06:44 AM IST

ताज्या बातम्या