S M L

बिहारच्या राजकारणात भूकंप, नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

Sachin Salve | Updated On: Jul 26, 2017 07:28 PM IST

बिहारच्या राजकारणात भूकंप, नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

26 जुलै : बिहारच्या राजकारणात आज मोठा भूकंप घडलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून नितीश कुमारांनी थोड्याच वेळापूर्वी आपला राजीनामा दिलाय.  नितीश कुमारांच्या राजीनाम्यामुळे बिहारमध्ये महायुती तुटली आहे. लालूप्रसाद यादव यांना हा मोठा धक्का आहे.

बिहारमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीला आज वेगळंच वळणं मिळालं. महायुतीतील राजद आणि जेदयूमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धानंतर नितीशकुमार यांनी मोठा निर्णय घेऊन भूकंप घडवलाय. राज्यपालांना भेटून नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर मीडियाकडे आपलं मन मोकळं केलं. बिहारमध्ये सुरू असलेल्या या राजकारणामुळे मला काम करता येणार नाही त्यामुळेच मी राजीनामा दिलाय. मी नोटबंदीला पाठिंबा दिला, रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला त्यामुळे माझ्यावर अनेक आरोप झाले. मला कुणी राजीनामा मागितला नाही. पण आज माझ्या आंतरात्माने आवाज दिला म्हणून आपण राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली.



तसंच बिहारमध्ये निर्माण झालेली राजकीय परिस्थिती हे कोणते संकट नाही. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहिली. पण आता ते अशक्य झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला असंही नितीशकुमारांनी सांगितलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीशकुमार आता मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांकडे करणार आहे. आज सकाळीच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रधान महासचिव केसी त्यागी यांनी याबद्दल तसे संकेतही दिले होते.

तेजस्वी यादव यांच्यावर राजीनाम्याचा दबाव टाकण्यात आला पण त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे नितीश कुमार राजीनामा देणार अशी शक्यता निर्माण झाली होती आणि अखेर आज संध्याकाळी नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भूकंप घडवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 06:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close