आंतरात्माने आवाज दिला म्हणून राजीनामा, नितीशकुमारांची पहिली प्रतिक्रिया

आंतरात्माने आवाज दिला म्हणून राजीनामा, नितीशकुमारांची पहिली प्रतिक्रिया

मला कुणी राजीनामा मागितला नाही. पण आज माझ्या आंतरात्माने आवाज दिला म्हणून आपण राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली.

  • Share this:

26 जुलै : बिहारमध्ये गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीला आज वेगळंच वळणं मिळालं. महायुतीतील राजद आणि जेदयूमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धानंतर नितीशकुमार यांनी मोठा निर्णय घेऊन भूकंप घडवलाय. राज्यपालांना भेटून नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नितीशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांकडे आपलं मन मोकळं केलं. बिहारमध्ये सुरू असलेल्या या राजकारणामुळे मला काम करता येणार नाही त्यामुळेच मी राजीनामा दिलाय. मी नोटबंदीला पाठिंबा दिला, रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला त्यामुळे माझ्यावर अनेक आरोप झाले. मला कुणी राजीनामा मागितला नाही. पण आज माझ्या आंतरात्माने आवाज दिला म्हणून आपण राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी दिली.

तसंच बिहारमध्ये निर्माण झालेली राजकीय परिस्थिती हे कोणते संकट नाही. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मी गेल्या काही दिवसांपासून वाट पाहिली. पण आता ते अशक्य झाल्यामुळे राजीनामा द्यावा लागला असंही नितीशकुमारांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2017 07:32 PM IST

ताज्या बातम्या