मराठी बातम्या /बातम्या /देश /

सुसाट जाणाऱ्या कारनं घेतला पेट, 2 मित्रांनी असा वाचवला जीव, पाहा VIDEO

सुसाट जाणाऱ्या कारनं घेतला पेट, 2 मित्रांनी असा वाचवला जीव, पाहा VIDEO

जर गाडी लॉक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. ही कार जळून खाक झाली आहे.

जर गाडी लॉक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. ही कार जळून खाक झाली आहे.

जर गाडी लॉक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. ही कार जळून खाक झाली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुजफ्फरपूर, 07 डिसेंबर : सुसाट वेगानं जाणाऱ्या कारला रात्रीच्या वेळेस अचानक आग लागली. काही क्षणात आगीनं रौद्र रुप धारण केलं. या कारमध्ये असलेल्या तरुणांनी जीव मुठीत धरून कसे बसे बाहेर पडले आहेत. बिहारच्या मुझफ्फरनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या कारमधून दोन जणांना सुखरुप बाहेर पडण्यात यश आलं आहे. गायघाट पोलीस स्टेशन परिसरातील हनुमान नगर येथे राष्ट्रीय महामार्ग 57 वर ही घटना घडली. वाहनातील दोन जणांनी कसाबसा कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. मिळालेल्या माहितीनुसार, गायघाटच्या कांता गावात राहणारा अभिषेक नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला गेला होता. आपल्या मित्रासोबत तिथून घरी परत येत असताना हा अपघात घडला आहे. हनुमान नगर जवळ गाडीच्या मागच्या बाजूला गाडीला भीषण आग लागली. अभिषेकनं गाडी थांबवली पण तोपर्यंत कारनं पेट घेतला होता. दोघांनी जीव मुठीत घेऊन कारमधून उडी मारली आणि जीव वाचवला. हे वाचा-धक्कादायक प्रकरण! डोक्यावरचं कर्ज हलकं करण्यासाठी स्वतःलाच केलं किडनॅप अपघातग्रस्त कार इंडिका होती आणि कारला ऑटोलॉक सिस्टिम होती. कारला आग लागल्यानंतर दरवाजा लॉक होणार तेवढ्यात दोघांनी गाडीतून आपला जीव वाचवला. जर गाडी लॉक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता. ही कार जळून खाक झाली आहे. या अपघाताची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली मात्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत कार जळून कोळसा झाली होती.
First published:

Tags: Bihar

पुढील बातम्या