Home /News /national /

धक्कादायक! Internet बंद होताच मृत्यूला कवटाळलं; विद्यार्थ्याने केली आत्महत्या

धक्कादायक! Internet बंद होताच मृत्यूला कवटाळलं; विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

इंटरनेट बंद होताच तणावातून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल.

    पाटणा, 21 जून : इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे. कित्येक काम इंटरनेटशिवाय शक्यच नाही. कोरोना काळात तर शाळा, कॉलेज, परीक्षाही ऑनलाइनच झाल्या. इंटरनेट थोड्या वेळासाठी जरी बंद झाला तर किती मोठा फटका बसू शकतो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आपल्याही वैयक्तिकरित्या बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी कित्येकांची चिडचिड होते, राग येतो. अशा इंटरनेट बंदच्या समस्येमुळे एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. इंटरनेट बंद होताच त्याने आत्महत्या केली आहे (Student suicide after internet ban). बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना. हर्षित प्रियदर्शी असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. 22 वर्षाचा हर्षित बीटेकचा विद्यार्थी होता. चंदीगढ युनिव्हर्सिटीतून तो बीटेक करत होता. त्याच्या ऑनलाईन परीक्षा सुरू होत्या. त्याने त्याच्या घरातच गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तो सापडला. हे वाचा - पाकिस्तानात प्रेग्नेंट हिंदू महिलेची धक्कादायक डिलिव्हरी; डॉक्टरांनी बाळाचं डोकं कापून ठेवलं गर्भाशयातच लाइव्ह हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार त्याचे वडील संजय सिंह यांनी सांगितलं की, लहान मुलाला घेऊन ते कोचिंग सेंटरच्या अॅडमिशनसाठी पाटणाला गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतल्यानंतर हर्षितच्या खोलीचा दरवाजा बंद होता. तो झोपला असावा असं मला वाटलं. पण बराच उशीर झाला त्यानंतर मी आवाज दिला, दरवाजा ठोकला तरी आतून काहीच प्रतिक्रिया नाही. त्याने आवाजही दिला नाही. त्यानंतर दरवाज्या वरील भागावर असलेल्या खिडकीतून पाहिलं तर तो पंख्याला लटकलेला होता. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह खोलीबाहेर काढला. नेट बंद असल्याने परीक्षा देता आली नाही. याच तणावातून त्याने केल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. हे वाचा - बेडरूममध्ये एकटं झोपायला घाबरत होती लेक; कारण समजताच हादरली आई हर्षितची सहाव्या सत्राची परीक्षा सुरू होती. संजय सिंह यांनी सांगितलं की, नेट सेवा बंद असल्याने तो परीक्षा देऊ शकत नव्हता, ज्यामुळे तणावात होता. आपण त्याची समजूत काढली होती. इंटरनेट बंद असल्याने काळजी करू नको. पुढील वेळेला परीक्षा दे. पण तरी तो चिंतेत होता. त्याचे सह विद्यार्थी परीक्षा देऊन पुढे निघून जातील आणि तो मागेच राहिलं असं त्याला वाटलं असावं. म्हणून त्याने असं टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्येचं दुसरं कोणतंच कारण नाही.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bihar, Suicide

    पुढील बातम्या