Bihar Board 10th Result: बिहार बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. विद्यार्थ्यांचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा बीएसईबीचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी केली होती.
बिहारमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना 2019 च्या परिक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहण्याचा आणि डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे.
बिहार शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आर के महाजन यांच्यासह बीएसईबीचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी निकाल 6 एप्रिलला घोषित होतील असं जाहीर केलं. मंडळाने 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान परिक्षा घेतली होती.
2019 च्या वार्षिक परिक्षेला 16 लाख 60 हजार 609 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता. राज्यातील 1 हजार 418 केंद्रावर परिक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी 26 जून 2018 ला निकाल जाहीर करण्यात आला होता. यात उत्तीर्णांचे प्रमाण 68.89 टक्के इतकं होतं.
असा पाहा निकाल
1. बिहार बोर्डाच्या अधिकृत biharboard.ac.in किंवा biharboardonline.bihar.gov.in किंवा bsebinteredu.in किंवा www.bsebbihar.com या वेबसाईट जा.
2. तिथे तुमचा रोल नंबर आणि रोल कोड भरा.
3. Submit वर क्लिक करा.
4. तुमचा निकाल स्क्रीनवर असेल.