अमर प्रेम ! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनंही सोडले प्राण, एकाच चितेवर अंत्यसंस्कार

अमर प्रेम ! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीनंही सोडले प्राण, एकाच चितेवर अंत्यसंस्कार

एकत्र आयुष्य जगण्याची शपथ घेणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यूदेखील एकाच वेळेस व्हावा... कोणत्याही पती-पत्नीमध्ये कधी एवढं प्रेम पाहिलं आहे का?

  • Share this:

पाटणा, 12 मे : एकत्र आयुष्य जगण्याची शपथ घेणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यूदेखील एकाच वेळेस व्हावा... कोणत्याही पती-पत्नीमध्ये कधी एवढं प्रेम पाहिलं आहे का?. पण अशी घटना सत्यता घडली आहे. एका खऱ्या प्रेमाची कहाणी बिहारमधील भागलपूर येथे पाहण्यास मिळाली आहे. या दाम्पत्याची कहाणी ऐकून तुमचंही हृदय पिळवटून जाईल. पत्नीच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकणाऱ्या तिच्या पतीनं केवळ अर्ध्या तासातच या जगाचा निरोप घेतला. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांनी या दोघांच्या पार्थिवावर एकाच वेळेस अंत्यसंस्कार केले.

वाचा :माणुसकीचा आदर्श : एका हिंदूचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम तरुणाने सोडला 'रोजा'!

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या भागलपूर येथे एचकारी गाव आहे. कहलगावातील एचकारी गावात राम स्वरूप दास (वय 75 वर्ष)  आपली पत्नी अंचला देवी (वय 65 वर्ष) यांच्यासोबत वास्तव्यास होते. दोन पुत्र, त्यांच्या पत्नी आणि नातंवड असा त्यांचा परिवार होता.  गेल्या काही दिवसांपासून राम स्वरूप दास आणि अंचला देवी आजारी होती. शनिवार अंजला देवी यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

वाचा :सततची नापिकी अन् कर्जाचा वाढता डोंगर..शेतकऱ्याने शेतातच केली आत्महत्या

पत्नीचा मृत्यूचा राम यांना जबरदस्त धक्का बसला. अंजला देवींचा विरह ते सहन करू शकले नाहीत. त्यांच्या मृतदेहाजवळ बसून रडत असताना राम यांनीही आपले प्राण सोडले. पत्नीच्या मृत्यूनंतर राम यांनीही केवळ अर्ध्या तासातच आपले प्राण सोडले.  आईवडिलांच्या अचानक जाण्यानं त्यांच्या मुलांसह संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वाचा :परभणीत तापमानाचा पारा वाढला.. उष्माघातानं वयोवृद्धाचा मृत्यू

कार इतक्यांदा उलटूनही 'तो' कसा वाचला, पाहा विचित्र अपघाताचा VIDEO

First published: May 12, 2019, 9:41 PM IST
Tags: biharlove

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading