सपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव

सपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर एकच धावपळ उडाली.

  • Share this:

16 नोव्हेंबर : बिहारमध्ये हरियाणाची डान्सिंग क्विन सपना चौधरीच्या कार्यक्रमात तरुणांनी प्रचंड गोंधळ घातला. या तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बिहार येथील बेगुसराय जिल्ह्यातील बछवारा पोलीस स्टेशन परिसरात छट महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सपना चौधरीला परफॉर्म करण्यासाठी बोलावले होते. सपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती. सपनाने आपला परफाॅर्म सुरू केला तेव्हा तरुणांनी एकच हुल्लडबाजी सुरू केली. काही तरूण बॅरिकेट्स तोडून स्टेजवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर एकच धावपळ उडाली. त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका तरुणाचा मृत्यू झाला.

सपना चौधरी मागील वर्षी बिग बाॅसच्या घरात पोहोचली होती.बिग बाॅसच्या घरात पोहोचल्यानंतर देशभरात तिला ओळखले जाऊ लागले. याआधीही राजस्थानमध्येही सपना चौधरीच्या कार्यक्रमात तरुणांनी गोंधळ घातला होता.

उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये झालेल्या कार्यक्रमातही तरुणांनी गोंधळ घातला होता. प्रयागराजमध्ये तर सपना चौधरीला कार्यक्रमच रद्द करावा लागला होता.

=============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 09:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading