बिहार ATSची मोठी कारवाई; दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

बिहार ATSची मोठी कारवाई; दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

बिहार एटीएसनं मोठी करवाई केली असून दोघांना ताब्यात घेतलं आहे.

  • Share this:

पाटना, 25 मार्च : पाटनामध्ये बिहार ATSनं मोठी कारवाई केली असून 2 बांग्लादेशींनी अटक केली आहे. या दोघांकडून काही कागदपत्रं देखील जप्त करण्यात आली असून त्या आधारे आता तपास सुरू आहे. दोघंही जमीयत-उल-मुजाहिद्दीन आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेश या दहशतवादी संघटनेचे सक्रीय सदस्य आहेत. खैरुल मंडल आणि अबु सुल्तान अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांकडून सैन्याबद्दलची काही माहिती देखील हाती लागली आहे. शिवाय, ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही कागदपत्रं देखील ताब्यात घेण्यात आली आहेत. त्या आधारे सध्या चौकशी सुरू आहे.






दहशतवादी पुन्हा हल्ल्याच्या तयारीत

दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याचा ISIS, अल कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली, मुंबई आणि गोव्यातील धर्मस्थळांवर दहशतवादी हल्ला करण्याचा ISIS आणि अल् कायदा या दहशतवादी संघटनांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. तसेच दहशतवाद्यांच्या रडारवर आता देशातील इतर ठिकाणं असल्याची महिती देखील समोर येत आहे. त्यामुळे प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळवून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक करत 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ATSPulwama
First Published: Mar 25, 2019 06:08 PM IST

ताज्या बातम्या