Home /News /national /

Bihar Election Result: AIMIM ला काँग्रेसनं संबोधलं 'वोट कटवा', म्हणाले, ओवैसींपासून सावधान!

Bihar Election Result: AIMIM ला काँग्रेसनं संबोधलं 'वोट कटवा', म्हणाले, ओवैसींपासून सावधान!

ओवैसी फॅक्टरनं सीमांचलचं समीकरण बदलू पाहात आहे...

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Election Result)कल आणि सुरुवातीचे (Bihar Assembly Election Results) निकाल समोर आले आहेत. बिहारच्या निकालांवरून देशभर प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्व निकाल जाहीर व्हायला रात्री उशीर होणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यात ओवैसी फॅक्टर सीमांचलचं समीकरण बदलू पाहात आहे. 11 जागांवर AIMIM पक्ष NDA ला भारी पडताना दिसत आहे. यावरून बिहारमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर निशाणा साधला आहे. हेही वाचा..दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या तरुणीवर गॅंगरेप करून विष पाजून फेकलं खासदार असदुद्दीन ओवैसी याचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) हा 'वोट कटवा' आहे, अशा शब्दांत अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली आहे. एवढंच नाही तर AIMIM ही भाजपचा (BJP) मित्र पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सर्व सेक्युलर पक्षांनी 'वोट कटवा' ओवैसी यांच्यापासून सावध राहायला हवं, असं देखील अधीर रंजन चौधरी यांनी सल्ला दिला आहे. बिहार निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचा भाजपनं स्वत: च्या स्वार्थासाठी वापर करून घेतला आहे, अशी टीका देखील अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार, बिहारमध्ये दोन जागांवर एआयएमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. एआयएमआयएमने बिहारमध्ये 20 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यात 14 जागा या सीमांचल भागातील आहेत. सीमांचलमध्ये किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहार जिल्हा येतो. सीमाचंलमध्ये विधानसभेच्या एकूण 24 जागा आहेत. त्यात नरपतगंज, रानीगंज, फारबिसगंज, अररिया, सिकटी, जोकीहाट, कटिहार, कदवा, बलरामपूर, प्राणपूर, मनिहारी, बरारी, कोढा, हादुरगंज, ठाकूरगंज, किशनगंज, कोचाधामन, कस्बा, बनमनखी, रुपौली, धमदाहा, पूर्णिया, अमौर आणि बैसीचा समावेश आहे. हेही वाचा..पुन्हा येणारच! ‘बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत’ एनडीएलाची बहुमताकडे वाटचाल.. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. समोर आलेल्या कलनुसार 243 जागांवर NDA 126 जागांवर आघाडीवर आहे. विषेश म्हणजे भाजपनं तर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा पक्ष जदयू पेक्षाही जोरदार मुसंडी मारली आहे. निवडणूक आयोगानुसार, महागठबंधनची 102 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे सत्तारूढ NDA बहुमताकडे वाटचाल करत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या