मराठी बातम्या /बातम्या /देश /

निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर, अमित शाहांची आज व्हर्च्युअल रॅली

निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर, अमित शाहांची आज व्हर्च्युअल रॅली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी संध्याकाळी 4 वाजता जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी संध्याकाळी 4 वाजता जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी संध्याकाळी 4 वाजता जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

  • Published by:  Kranti Kanetkar

पटना, 07 जून : भाजपनं पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष अमित शाह रविवारी बिहारमध्ये जनतेसोबत संवाद साधणार आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही ऑनलाईन रॅली करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत भाजप कार्यकर्तेही यामध्ये सामिल होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी संध्याकाळी 4 वाजता जनतेसोबत ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यासाठी बिहारमध्ये 72 हजार LED स्क्रीन लावण्यात आले आहेत. या रॅलीत सुरुवातील केवळ 22 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता मात्र आता संपूर्ण बिहारमध्ये 72 क्रीन बसवल्याची माहिती मिळत आहे. ऑनलाईन रॅलीद्वारे अमित शाह यांचं भाषण 2 लाख लोक ऐकणार आहेत.

हे वाचा-करुन दाखवलं! भारताने तयार केली स्वस्त कोरोना किट, अवघ्या काही मिनिटांत रिझल्

आतापर्यंत पहिल्यांदाच अशाप्रकारची ऑनलाइन रॅली काढण्यात येत असल्यानं बिहारमधील जनताही चांगला प्रतिसाद देईल. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाईन रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही रॅली ऐतिहासिक असेल आणि यशस्वी होईल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जैस्वाल यांनी व्यक्त केला आहे.

अमित शहा यांचे भाषण 72 हजार बूथवर ऐकण्याची तयारी भाजप नेत्यांनी केली आहे. या विधानसभा मतदारसंघात 4-5 हजार लोकांना जोडण्याचे लक्ष्य आहे. यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी एका ठिकाणी 50 पेक्षा जास्त लोक जमणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली आहे. अमित शाहांचं भाषण ऐकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे वाचा-मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध,  अल्कोहल असल्याचं दिलं अजब कारण

संपादन- क्रांती कानेटकर

First published:

Tags: Amit Shah, Coronavirus, Lockdown