Home /News /national /

Bihar Election 2020: JDU चे प्रवक्ते के सी त्यागी यांनी मान्य केला पराभव, म्हणाले..

Bihar Election 2020: JDU चे प्रवक्ते के सी त्यागी यांनी मान्य केला पराभव, म्हणाले..

सुरूवातीपासूनच एनडीए आणि महागठबंधन आघाडीत काट्याची लढत पाहायला मिळत आहेत.

    पाटणा, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly elections Result 2020) मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सुरूवातीपासूनच एनडीए आणि महागठबंधन आघाडीत काट्याची लढत पाहायला मिळत आहेत. मात्र, सुरूवातीला हाती आलेल्या कल मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची धडधड वाढवणारे आहेत. कारण तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात मैदानात उतरलेल्या महागठबंधननं मुसंडी मारली आहे. त्यामुळे जेडीयूचे प्रवक्ते के सी त्यागी नाराज झाले आहेत. वृत्त संस्था 'एएनआय'शी (NAI) बोलताना के सी त्यागी यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एनडीएला (NDA) केवळ कोविड-19 (COVID-19)मुळे पराभवाचा सामना करावा लागत आहे. हेही वाचा...व्हाइट हाउस सोडताच 'या' गुन्ह्यांमुळे ट्रम्प यांची होणार जेलमध्ये रवानगी के सी त्यागी म्हणाले, 'एका वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी (RJD) एकही जागा जिंकू शकली नव्हती. लोकसभा निकाल पाहाता एनडीएनं 200 हून अधिक जागा मिळवणं अपेक्षीत आहे. मात्र, यंदा नीतीशकुमारांची हवा गुल झाली आहे. त्यांचा जोर कमी पडला आहेय. मात्र, कोविड-19 च्या संकटामुळे एनडीएला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे त्यागी यांनी म्हटलं आहे. त्‍यागी म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत नीतीशकुमारांचा करिश्मा कुठे गायब झाल्याचं दिसत आहे. तेजस्वी यादव यांनीही फारसा काही जोर लावलेला दिसत नाही. शिवसेना खासदारांनी लगावला टोला.. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, बिहारमध्ये तेजस्वी लाट आली आहे. तेजस्वी यांना बिहार जनतेची उत्तम साथ मिळत आहे. जदयू (JDU)चे प्रवक्ता के.सी. त्यागी म्हणत आहे, त्यांना कोविड-19 चा फटका बसला. म्हणजे ते नागरिकांना सुविधा देण्यात सपशल अपयशी ठरले आहेत. 30 वर्षांत एका बिहारी तरुणानं थेट केंद्र सरकारला आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये आता 'तेजस्वी लाट' आली आहे. बिहारमध्ये 15 वर्षांचं जंगलराज आता समाप्त झालं आहे. आता 'मंगलराज' सुरू झालं आहे. महाराष्ट्राच्या मुद्यावर बिहारमध्ये निवडणूक लढणाऱ्या भाजपलाही जनतेनं सपशेल नाकारल्याचं दिसत आहे. देशात परिवर्तनाला महाराष्ट्रातून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र याबाबत कायम अग्रेसर राहील, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे? निकाला आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) समोर आले आहे बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण धुरा त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठीही तेजस्वी यादव यांचाच चेहरा पुढे करण्यात आला. हेही वाचा..शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा ते शरद यादव यांची मुलगी, या आहेत 'हाय व्होल्टेज' लढती निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली आणि नवख्या तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election, Nitish kumar

    पुढील बातम्या