मराठी बातम्या /बातम्या /देश /

वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांचा प्रॅक्टिस करतानाचा Video व्हायरल, ड्रामेबाजीचा आरोप

वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांचा प्रॅक्टिस करतानाचा Video व्हायरल, ड्रामेबाजीचा आरोप

Chirag-paswan viral video: 'लोकांनी जागरूकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच हाकलले पाहिजे.'

Chirag-paswan viral video: 'लोकांनी जागरूकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच हाकलले पाहिजे.'

Chirag-paswan viral video: 'लोकांनी जागरूकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच हाकलले पाहिजे.'

  पाटना 27 ऑक्टोबर: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला  काही तास राहिलेले असताना चिराग पासवान (Chirag Paswan) यांचा VIDEO व्हायरल झालाय. चिराग हे त्यांचे वडिल स्वर्गिय रामविलास पासवान (Ramvilas Paswan) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषणाची प्रॅक्टिस करत असताना त्यात दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने चिराग यांच्यावर हल्लाबोल केलाय. चिराग पासवान हे ड्रामेबाजी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या व्हिडीओमध्ये चिराग पासवान हे रामविलास पासवान यांच्या फोटो समोर उभे राहून भाषणाची तयारी करत होते. चिराग यांच्या आजुबाजूला कॅमेरामन आणि इतर काही लोकं होती. त्यांना ते काही सूचना करत होते. काही ओळी म्हटल्यानंतर ते पुढे काय म्हणायचं ते विसरले आणि पुन्हा शुट करण्यास सांगू लागले. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्या पंखुरी पाठक यांनी हा व्हिडीओ ट्विट करत असं नाटकं करणं हे लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. अशा नाटकी लोकांमुळेच राजकारण हे बदनाम झाल्याची टीकाही त्यांनी केली. लोकांनी  जागरूकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडून अशा लोकांना राजकारणाच्या बाहेरच हाकलले पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Bihar Election

  पुढील बातम्या