Bihar: 'एक क्रिकेटर तर दुसरा अभिनेता...', तेजस्वी आणि चिराग यांच्यावर नितीश कुमार बरसले

Bihar: 'एक क्रिकेटर तर दुसरा अभिनेता...', तेजस्वी आणि चिराग यांच्यावर नितीश कुमार बरसले

'यांना आपलाच परिवारच सर्वस्व वाटतो तर बिहारची जनता हा माझा परिवार आहे. बिहारला पुन्हा अंधार युगात जायचं नाही तर विकास करायचा आहे.'

  • Share this:

पाटना 01 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar-assembly-election) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधी मुख्यंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी जोरदार टीका केली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव आणि लोकजनशक्तीचे चिराग पासवान यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. चिराग पासवान यांनी चित्रपटामध्ये काम केलं होतं. तर तेजस्वी यादव यांना क्रिकेट आवडतं त्यावरून त्यांनी दोघांवरही टीका केली. ‘न्यूज18 बिहार-झारखंड’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नितीश कुमार म्हणाले, यांना आपलाच परिवारच सर्वस्व वाटतो तर बिहारची जनता हा माझा परिवार आहे. बिहारला पुन्हा अंधार युगात जायचं नाही तर विकास करायचा आहे. नितीश कुमार यांनी या निवडणुकीच्या प्रचारात या दोन्ही युवा नेत्यांवर वारंवार टीका केली होती. तेजस्वी यांच्या सभांना गर्दी होत आहे त्यावरही ते म्हणाले, केवळ गर्दी झाली म्हणजे लोक मागे आहेत असं नाही असं त्यांनी सांगितलं. लालू प्रसाद यादव यांच्या काळात जे काही झालं ते जनता विसरली नाही असंही ते म्हणाले.

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

‘बलात्कार झाला तर महिला मरण पत्करते’, काँग्रेस नेत्याचं बेताल वक्तव्य

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला मतदान झालं तर, दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

लडाख: 16 हजार फुटांवर डॉक्टरांनी केलं जवानाचं ऑपरेशन, धाडस पाहून कराव कराल सलाम!

निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 1, 2020, 11:10 PM IST

ताज्या बातम्या