मराठी बातम्या /बातम्या /देश /

Bihar Exit Poll 2020 : बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची लाट, 'या' एका मुद्द्याने फिरवलं वातावरण

Bihar Exit Poll 2020 : बिहारमध्ये तेजस्वी यादव यांची लाट, 'या' एका मुद्द्याने फिरवलं वातावरण

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे.

    पाटणा, 7 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज संध्याकाळी 6 वाजता पार पडलं. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान झालं असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र त्याआधी आता मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) समोर येत असून निवडणूक निकाल कोणाच्या बाजूला झुकलेला असू शकतो, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळणार आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे. कुणाला किती जागा मिळणार? जेडीयू : 70 भाजप : 42 RJD - 85 काँग्रेस 25 तेजस्वी यादव यांच्या एका वाक्याने बदललं निवडणुकीचं वातावरण राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण धुरा त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठीही तेजस्वी यादव यांचाच चेहरा पुढे करण्यात आला. निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली आणि नवख्या तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला. हेही वाचा - EXIT POLL : कोण होणार मुख्यमंत्री? 'या' एका मुद्द्याचा बिहार निवडणुकीवर झाला परिणाम? बिहारमधील बहुतांश तरुण हे पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यांमध्ये जातात. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प पडल्याने या असंघटीत कामगारांचा रोजगार गेला आणि नाईलाजाने त्यांना पुन्हा घरची वाट धरावी लागली. त्यातच बिहारमध्ये निवडणुकांची घोषणा झाली. लॉकडाऊनमध्ये रोजगार हिरावलेला...परिणामी मोठं आर्थिक संकट ओढावलेलं...अशा कात्रीत बिहारी तरुण सापडलेला असतानाच तेजस्वी यादव यांनी एक घोषणा केली आणि संपूर्ण निवडणुकीचं वातावरणच बदलून गेलं. पहिल्या कॅबिनेटमध्ये देणार 10 लाख सरकारी नोकऱ्या तेजस्वी यादव यांनी आपण ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचं सांगितलं आणि मला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाल्यास पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्या देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. या घोषणेला बिहारमधील तरुण वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेजस्वी यादव त्यांच्या प्रत्येक जाहीर सभेत तरुणांना या घोषणेची आठवण करून देत आणि रोजगाराच्या शोधात असलेला बिहारी तरुणही टाळ्या आणि शिट्ट्यांसह या घोषणेला प्रतिसाद देत. तेजस्वी यादव यांनी खेळलेल्या या खेळीची दखल जेडीयू-भाजप युतीलाही घ्यावी लागली. एनडीएने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात 19 लाख रोजगार देऊ, असं आश्वासन दिलं. मात्र तोपर्यंत तेजस्वी यादव यांनी तरुणांच्या मनाचा ठाव घेतला असावा, असंच नुकत्याच आलेल्या एक्झिट पोलमधून दिसत आहे. असं असलं तरीही 10 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल जाहीर होतील आणि त्यानंतरच नेमकं चित्र स्पष्ट होईल. कसं बदलत गेलं वातावरण...20 ऑक्टोबरच्या ओपिनियन पोलमध्ये काय होता अंदाज? लोकनीती आणि CSDS यांनी 20 ऑक्टोबर रोजी एक ओपिनियन पोल घेत बिहारमधील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यात NDA ला 133-143 जागा, महाआघाडीला 88-98, लोकजनशक्ती 2-6 तर इतर पक्षांना 6 ते 10 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या ओपिनियन पोलनुसार लोकांनी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती दिली. त्यांना 31 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती तर राजदचे तेजस्वी यादव यांना 27 टक्के लोकांनी पसंती दाखवली होती. 24 ऑक्टोबरच्या ओपिनियन पोलमध्ये काय होती बिहारमधील स्थिती? ‘ABP- C VOTER’ यांनी 24 ऑक्टोबर रोजी केलेल्या Opinion pollमध्ये नितीश कुमार यांच्या NDAला 43 टक्के राजदकाँग्रेसच्या महाआघाडीला 35 तर लोक जनशक्तीला 4 टक्के तर इतर पक्षांना 18 टक्के मतदान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तर NDAला 135-159, महाआघाडी 77-98, लोक जनशक्ती 1-5 तर अन्य पक्षांना 4-8 एवढ्या जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली होती.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election

    पुढील बातम्या