मराठी बातम्या /बातम्या /देश /

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! उमेदवाराची गोळी घालून हत्या, समर्थकांनी हल्लेखोरालाही मारून टाकलं

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! उमेदवाराची गोळी घालून हत्या, समर्थकांनी हल्लेखोरालाही मारून टाकलं

बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आला असतानाचा एक मोठी बातमी समोर आली आहे.

बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आला असतानाचा एक मोठी बातमी समोर आली आहे.

बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आला असतानाचा एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
शिवहर, 25 ऑक्टोबर : बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आला असतानाचा एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराची भर प्रचारादरम्यान हत्या करण्यात आली आहे. या हल्लेखोरानं प्रचारामध्ये घुसून उमेदवाराची गोळ्या घालून हत्या केली आणि संतापलेल्या समर्थक आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी या हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेमुळे प्रचारसभेदरम्यान खूप मोठा गदारोळ निर्माण झाला होता. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे असलेले जनता दल राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण सिंह यांची शिवहरच्या हातसर गावात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या दरम्यान त्याच्या दोन समर्थकांनाही गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेत नारायण यांच्यासह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नारायण सिंह शिवहर इथल्या हथसार गावात प्रचारासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नारायण सिंह यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. प्रचारासाठी बाहेर गेलेल्या नारायणच्या ताफ्यावर अचानक दहा सशस्त्र लोकांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात श्रीनारायण आणि त्याच्या समर्थकाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इतर दोन जणांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. हे वाचा-Opinion poll Bihar: नितीश कुमारांनाच लोकांची पसंती, ‘काँग्रेस-राजद’ला धक्का गोळीबार केल्यानंतर तिथून हल्लेखोर पळून जात असताना एकाला संतप्त जमावानं घेरलं आणि त्याला गावकऱ्यांनी धाडस दाखवत बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोराला ग्रामस्थांच्या तावडीतून वाचवले. यामध्ये हल्लेखोर गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्लेखोराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
First published:

Tags: Bihar, Bihar Election

पुढील बातम्या