EVM नाही तर MVM म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशिन’, राहुल गांधीनी केलं पंतप्रधानांना टार्गेट VIDEO

EVM नाही तर MVM म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशिन’, राहुल गांधीनी केलं पंतप्रधानांना टार्गेट VIDEO

'बिहारमधल्या युवकांमध्ये राग आहे आणि हा राग ते आता मतपेटीतून व्यक्त करतील त्यामुळे महाआघाडीचा विजय निश्चित आहे.'

  • Share this:

पटना 04 नोव्हेंबर: बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे (Bihar assembly election 2020) दोन टप्पे झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यासाठी प्रसार सुरू आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता मैदानात उतरले आहेत. अररिया इथल्या प्रचार सभेत बोलताना राहुल यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. EVM हे EVMनसून MVM आहे,  म्हणजे ‘मोदी व्होटिंग मशिन’ (Modi Voting Machine) पण आता हे समिकरण बदलणार असून लोक महाआघाडीलात मतदान करतील असं म्हटलं आहे.

बिहारमधल्या युवकांमध्ये राग आहे आणि हा राग ते आता मतपेटीतून व्यक्त करतील त्यामुळे महाआघाडीचा विजय निश्चित आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

या निवडणुकीत राहुल गांधी यांनी मोजक्याच प्रचारसभा घेतल्या आहे. या आधीही EVMवरून देशभर वादळ निर्माण झालं होतं. EVM हॅक केल्या जाऊ शकतात असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं.

आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांना टार्गेट केलंय.

बिहारमध्ये काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि तर पक्षांची महाआघाडी आहे. सर्व ओपिनीयन पोल्समध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या NDAलाच बहुमत मिळणार असल्याचा दावा केला आहे.

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली. आत्तापर्यंत दोन टप्पे झाले असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला मतदान झालं. तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.  विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.

निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 4:26 PM IST

ताज्या बातम्या