अररिया, 14 फेब्रुवारी : बिहारमध्ये इंटर परीक्षा सुरु असताना एका घटनेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुरुवारी या परीक्षेचा शेवटचा दिवस होता. अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज शहरामध्ये ही घटना घडली. भगवती देवी गोयल हायस्कुलमध्ये एक गरोदर मुलगी परीक्षा देत होती. परीक्षा देत असताना तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. कॉलेज प्रशासनाला माहिती मिळताच त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेला बोलवण्यात आलं. यावेळी मुलीची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे सर्वांनाच तिच्या तब्येतीबाबत काळजी वाटत होती. मात्र डिलीव्हरीनंतर आई आणि बाळाची दोघंही सुखरुप आहेत.
(हेही वाचा- बापरे ! मुलगी की झाडाचं खोड; दुर्गम भागातल्या चिमुरडीची विचित्र आजाराशी झुंज)
गोयल हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी या गरोदर मुलीला प्रसुती वेदना सुरु झाल्याची त्यांना माहिती मिळाली. तात्काळ त्यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याठिकाणी ANM आणि आशा कर्मचारी रुग्णवाहिका घेऊन पोहोचले. मात्र परीक्षा केंद्रावरच या मुलीने गोंडस बाळाला जन्म दिला.या मुलीची परिस्थिती अत्यंत गंभीर होती, मात्र आशा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या मुलीची सुखरुप डिलीव्हरी परीक्षा केंद्रावरच झाली.
अन्य बातम्या
Board Exam : परीक्षेचं टेन्शन दूर करायचं असेल तर एकदा हे VIDEO पाहाच
हे फक्त भारतातच होऊ शकतं! व्हिडीओ कॉलवर उरकले लग्नाचे विधी, पाहा VIDEO
मुलगी नोकरी करणारीच हवी; लग्न करताना मुलाची का असते अशी अट?