धक्कादायक! 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटात आढळलं 8 महिन्यांचं भ्रूण

धक्कादायक! 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटात आढळलं 8 महिन्यांचं भ्रूण

महिन्याभरापूर्वी 6 महिन्यांच्या बाळाला पोटदुखीमुळे रुग्णालयातील शिशु विभागात दाखल केलं होतं त्यानंतर सीटीस्कॅनमधून ही धक्कादायक बाब समोर आली.

  • Share this:

पटना, 07 फेब्रुवारी: 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटात 8 महिन्यांचं भ्रूण आढळल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. कोणालाही विश्वास बसणार नाही पण ही घटना खरोखर घडल्याचं सांगितलं जात आहे. बिहारमधील पटना परिसरात 6 महिन्यांच्या बाळाच्या पोटातून ऑपरेशन करून भ्रूण काढण्यात आलं. त्यानंतर आता बाळाची सध्या प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

काय आहे नेमका प्रकार

एक महिन्यापूर्वी बिहार इथल्या बक्सर जिल्ह्यात रहिवासी असलेल्या मोहम्मद मोइद्दीन यांनी आपल्या 6 महिन्यांचा बाळाच्या पोटात वारंवार दुखत असल्यानं रुग्णालयात दाखवलं. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाची प्रकृती तपासून निदान करण्यासाठी सीटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. या बाळाला नीट खाताही येत नव्हतं. याशिवाय लघवीच्या समस्या होऊ लागल्या. दिवसेंदिवस बाळाचं पोट फुगत चालल्यानं चिंता वाटू लागली. डॉक्टरांनी सीटीस्कॅननंतर जो रिपोर्ट सांगितला ते पाहून तर कोणचाही विश्वासच बसेना, डॉक्टरही हैराण झाले.

हेही वाचा-VIDEO : 'ए इकडे ये, माझ्या पायातले बूट काढ,' वनमंत्र्यांची पुन्हा मुजोरी

6 महिन्यांच्या बाळाच्या पोटात 8 महिन्यांचं भ्रूण होतं. त्यांच्या हाता-पायांची वाढ होत होती. डॉक्टरांनी ऑपरेशन करून हे भ्रूण काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तयारी करावी लागणार होती. 1 महिन्यानंतर 4 डॉक्टरांच्या टीमनं अखरे 6 महिन्यांच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली आणि 8 महिन्यांचं भ्रूण पोटातून काढण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण रोज 50 हजार नवजात बालक जन्माला येतात. त्यामध्ये एकादी केस अशा पद्धतीची असते. या केसमध्ये बालकाच्या पोटात मांसाचा गोळा होता. जो दिवसेंदिवस वाढत असल्यानं त्याला होणारा त्रास वाढत गेला. हे भ्रूण मृत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. सध्या या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

हेही वाचा-नवरदेवाच्या तोंडात ठेवली नोट, घोड्यावर चढून तरुणाचा भयंकर नागिन डान्स, VIDEO

First published: February 7, 2020, 8:06 AM IST

ताज्या बातम्या