Home /News /national /

Bihar Blast: फटाके बनवताना स्फोट, 7 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; 4 घरंही जमीनदोस्त

Bihar Blast: फटाके बनवताना स्फोट, 7 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; 4 घरंही जमीनदोस्त

Bihar Blast: बिहारमधील भागलपूर येथे झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात 7 जणांचा (Blast in Bhagalpur) मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

    बिहार, 04 मार्च: बिहारमधील भागलपूर येथे झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात 7 जणांचा (Blast in Bhagalpur) मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. येथे जिल्ह्यातील ततारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील काजवलीचक यतीमखानाजवळ झालेल्या या भीषण स्फोटात 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला. स्फोट इतका जबरदस्त होता की 4 घर पूर्णपणे जमीनदोस्त झालीआहेत. यासोबतच अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. घटनेनंतर भागलपूरचे अनेक लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले आहेत. जेसीबी लावून डेब्रिज हटवलं जात आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. फटाके बनवताना हा स्फोट झाल्याचं पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. एसएसपी बाबू राम यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात फटाके बनवताना स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. रात्री 11.35 वाजता एका घरात स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या घरात शीला देवी आणि लीला देवी राहत होत्या. स्फोटाची तीव्रता एवढी होती की आजूबाजूची आणखी दोन घरे जमीनदोस्त झाली. याशिवाय अन्य काही घरांचंही नुकसान झाले आहे. घराचे तुकडे अर्धा किलोमीटर दूरपर्यंत उडून गेले. शीला देवी, गणेश कुमार आणि सहा महिन्यांच्या बाळाचे मृतदेह काही वेळातच ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलं. जखमींना ही एक एक करून रुग्णालयात नेण्यात आलं. सर्व मृत आणि जखमी काजवली चौक, ततारपूर येथील रहिवासी आहेत. हा स्फोट इतका जोरदार होता की 5 किलोमीटरपर्यंत लोकांनी स्फोटाचा आवाज ऐकला. बिहारचे मंत्री शाहनवाज हुसैन यांनी या घटनेवर बोलताना सांगितलं की, भागलपूर घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण रुग्णालयात दाखल आहेत. अजूनही घटनास्थळावरील डेब्रिज हटवण्याचे काम सुरू आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. युक्रेनहून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी, अर्ध्या रस्त्यातूनच नेलं कीवला ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना कोतवाली पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या एका घरातील आहे. या स्फोटात तीन मजली घर जमीनदोस्त झाले. घटनेची माहिती मिळताच डीआयजी सुजित कुमार, डीएम सुब्रत कुमार सेन, एसएसपी बाबू रामही घटनास्थळी पोहोचले आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Bihar

    पुढील बातम्या