Home /News /national /

11 हजार वोल्टचा झटका! विजेचा शॉक लागताच जिवंत जळाली वृद्ध व्यक्ती; जागच्या जागी तडफडून मृत्यू

11 हजार वोल्टचा झटका! विजेचा शॉक लागताच जिवंत जळाली वृद्ध व्यक्ती; जागच्या जागी तडफडून मृत्यू

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

11 हजार वोल्ट विजेची तार कोसळताच वृद्ध व्यक्तीचं शरीर पेटलं.

    पाटणा, 22 जून : विजेचा करंट किती भयंकर ठरू शकतो, याचाच प्रत्यय देणारं एक प्रकरण समोर आलं आहे. विजेचा करंट लागताच एक व्यक्ती जिवंत जळाली आहे. वीज कोसळावी तशी या व्यक्तीवर विजेची तार कोसळली आणि जागच्या जागी तडफडून या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या बेतियामधील ही धक्कादायक घटना आहे (Person burnt alive by current). कुर्मी टोला गावात राहणारे 65 वर्षांचे भुटी प्रसाद आपल्या घराच्या दरवाजाजवळ बसले होते. त्याचवेळी त्यांच्यावर 11 हजार वोल्टची तार कोसळली (Person burnt alive by 11000 volt current). विजेची तार कोसळताच त्यांचं शरीर पेटलं. त्यांच्या घरातील लोक धावत बाहेर आले पण विजेचा करंट असल्याने पुढे जायची हिंमत कुणीच केली नाही. कुणीच काही करू शकलं नाही आणि कुटुंबाच्या डोळ्यादेखत जळून तडफडून त्यांचा जीव गेला. हे वाचा - मांजर खातपित नाही म्हणून डॉक्टरकडे नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहताच मालकाला बसला धक्का दैनिक भास्करच्या वृत्तानुसार भुटी प्रसाद यांचा नातू राज कुमारने सांगितलं, सहा वर्षांपूर्वी त्यांच्या घराच्या वरून ही 11 हजार वोल्टच्या लाइनची तार टाकण्यात आली. कित्येक घरांच्या वरून ही तार जाते. ही तार घरांवरून हटवण्याची मागणी करण्यात आली होती, पण प्रशासनाने लक्ष दिलं नाही. तारेच्या करंटमुळे याआधीही दोघांचा मृत्यू झाला आहे. 11 हजार व्होल्टचा झटका किती खतरनाक? विजेच्या शॉकबाबत म्हणायचं तर आपण  440 व्होल्टच्या झटक्याबाबत ऐकलं आहे. घरांमध्ये सिंगल फेजमधून येणारा विद्युतप्रवाह केवळ 220 व्होल्टचा असतो. या 220 व्होल्टच्या करंटवर आपल्या घरातली जवळपास सर्व उपकरणं चालतात. मोठी उपकरणं सिंगल फेजवर चालत नाहीत. मोठी उपकरणं चालण्यासाठी थ्री-फेज कनेक्शन (Three Phase Connection) आवश्यक असतं. तीन-फेज कनेक्शनमध्ये 440 व्होल्ट पॉवर असते. म्हणजेच 440व्होल्ट मोठी उपकरणं चालविण्यास सक्षम असतं. छोटी उपकरणं थेट 440 व्होल्टच्या मदतीनं चालविली तर ती खराब होतात. हे वाचा - VIDEO : हातात साधा पॅन घेऊन खतरनाक मगरीला मारायला गेले आजोबा; धक्कादायक शेवट वीजेचा झटका लागून मृत्यू  झाल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात.  जेव्हा वीजप्रवाह आपल्या शरीरातून वाहून जमिनीत जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या शरीराला वीजेचा धक्का म्हणजे शॉक बसतो. पण मानवी शरीर 50 व्होल्टपेक्षा जास्त क्षमतेचा झटका फार सहन करू शकत नाही. 440 व्होल्टचा करंट लागल्यास मृत्यूची शक्यता सर्वाधिक असते. पण एखाद्याला 11000 व्होल्टचा झटका लागला तर काय हे तुम्ही या बातमीतून समजलंच असेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bihar, Fire

    पुढील बातम्या