35 पोळ्या आणि 10 प्लेट भात, क्वारंटाइन सेंटरमध्ये 10 जणांचं जेवण खातोय हा तरुण

35 पोळ्या आणि 10 प्लेट भात, क्वारंटाइन सेंटरमध्ये 10 जणांचं जेवण खातोय हा तरुण

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला एकावेळी 8 ते 10 प्लेट भात आणि 30 ते 35 चपात्या जेवणात खायला लागतात.

  • Share this:

बक्सर, 29 मे : आपल्या खुराकामुळे एक तरुण सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. एकीकडे मजुरांना खायला मिळत नसताना या तरुणाचा मात्र गोनपाटात धान्य भरतात तसं पोट अन्न भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हा तरुण आपल्या या अशा भयंकर खाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे क्वारंटाइन सेंटरमधील अधिकारी आणि लोक तर त्याच्याकडे पाहातच राहिली. हा तरुण जवळपास एका वेळी 10 लोकांना पुरेल एवढं जेवण जेवतो.

मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील मज्वारी इथे सरकारी शाळेत क्वारंटाइन सेंटर करण्यात आलं आहे. या क्वारंटाइन सेंटरमध्ये हा तरुण असल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला एकावेळी 8 ते 10 प्लेट भात आणि 30 ते 35 चपात्या जेवणात खायला लागतात.

हे वाचा-बाप रे! रेड झोनमधून आलेला घोडासुद्धा माणसाप्रमाणं झाला क्वारंटाइन

23 वर्षीय अनुप ओझा असं या तरुणाचं नाव आहे. सुरुवातीला अधिकाऱ्यांनाही ही गोष्ट पटेना मात्र एक दिवस त्यांनी क्वारंटाइन सेंटरला भेट दिली तेव्हा लिट्टी बनवल्या होत्या. या तरुणानं 85 लिट्टी एकट्यानं गट्टम केल्या अधिकारी हा सगळा प्रकार पाहातच राहिले. या क्वारंटाइन सेंटरला मिळणारं धान्य मर्यादित असल्यानं एक माणूस एवढं अन्न एकटा खात असेल तर बाकीच्यांना काय उरेल असा सवालही उपस्थित करण्यात आला.

ही बाब केंद्रातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आणि त्यांनी या तरुणाला भूकेलं ठेवू नये असा सूचनाही दिल्या आहेत. त्यासाठी आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. त्याला हव्या त्या सुविधा देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे वाचा-दोन छोट्या भावंडांचे VIDEO झाले धम्माल हिट; ऑस्ट्रेलियातून गातायत मराठी गाणी

हे वाचा-वानरानं वाघाची जिरवली! हल्ला करण्याआधीच मारली थोबाडीत, VIDEO VIRAL

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 29, 2020, 3:08 PM IST

ताज्या बातम्या