मराठी बातम्या /बातम्या /देश /

अंकित शर्मांच्या हत्येचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती, अमित शहांनी केला खुलासा

अंकित शर्मांच्या हत्येचा मोठा पुरावा पोलिसांच्या हाती, अमित शहांनी केला खुलासा

एका सर्वसामान्य नागरिकाने पाठविलेला एक व्हिडीओ एसआयटीला मिळाला आहे

एका सर्वसामान्य नागरिकाने पाठविलेला एक व्हिडीओ एसआयटीला मिळाला आहे

एका सर्वसामान्य नागरिकाने पाठविलेला एक व्हिडीओ एसआयटीला मिळाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 12 मार्च : आयबी (IB) अधिकारी अंकित शर्मा यांना (Ankit Sharma) कसं व कोणी मारलं, यावर लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे. तपासात गुंतलेल्या एसआयटीला अंकित शर्माच्या हत्येचे महत्त्वपूर्ण संकेत हाती लागले आहेत. एसआयटीच्या (SIT) हाती एक व्हिडीओ लागला असून ज्यामध्ये अंकित शर्माच्या हत्येची रहस्ये खुली होऊ शकतात.

एका सर्वसामान्य नागरिकाने हा व्हिडीओ (Video) पाठविला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी स्वत: बुधवारी हे संकेत दिले. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिल्ली दंगलीवरील (Delhi violence) चर्चेदरम्यान सांगितले की, दंगलीत सामील असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी जाहिराती इत्यादी माध्यमातून लोकांपर्यंत व्हिडीओ पाठविण्यात आले होते. हजारो व्हिडीओ पोलिसांना मिळाले आहेत. या व्हिडीओमधून अंकित शर्मा यांच्या हत्येचं रहस्य खुलं होईल, शहा यावेळी म्हणाले.

संबंधित - स्वरा भास्करच्या अडचणीत वाढ, राजद्रोहाचा गुन्हा केला दाखल

अमित शहा यांच्या वक्तव्यामुळे पोलिसांना मिळालेल्या व्हिडीओमधून अंकित शर्मांच्या हत्येचे रहस्य उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली दंगलीचा तपास करणार्‍या पोलिसांनी चेहरे ओळखण्यासाठी आयडेंटिफिकेशन सॉफ्टवेअरचा आधार घेतला आहे. यात दिल्लीच्या एकूण 12 पोलीस स्टेशन क्षेत्रातील सुमारे 61 वर्ग किलोमीटर क्षेत्रातील सुमारे 20 लाख लोकांचे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींचे चेहऱ्याचे नमूने समाविष्ट केले गेले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही आणि जनतेने पाठविलेल्या व्हिडीओंचे चेहरे जुळविण्याचा प्रयत्न केला जात आहेत.

संबंधित - धक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार

आतापर्यंत 1100 हून अधिक लोकांना ओळख पटविण्यात आली आहे. यात यूपीहून 300 पेक्षा अधिक लोक दंगल करण्यासाठी आले होते. यानुसार हे एक षडयंत्र असल्याचे उघड होते. गृहमंत्री अमित शहा यांनी याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, एकाच समाजातील 1100 लोकांना पकडणे चुकीचे आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 2647 लोकांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित - Delhi Violence: दंगेखोरांनी केली IB कॉन्स्टेबलची हत्या, नाल्यात फेकला मृतदेह

First published: