मराठी बातम्या /बातम्या /देश /

भलामोठा ट्रक कारवर पलटला; एका गोष्टीमुळे भीषण अपघातातून बचावला ड्रायव्हर, PHOTO पाहून हादराल!

भलामोठा ट्रक कारवर पलटला; एका गोष्टीमुळे भीषण अपघातातून बचावला ड्रायव्हर, PHOTO पाहून हादराल!

हा अपघात इतका भयंकर होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली.

हा अपघात इतका भयंकर होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली.

हा अपघात इतका भयंकर होता की कार पूर्णपणे चक्काचूर झाली.

    सूरत, 25 जानेवारी : या जिल्ह्यातील बारडोली चार रास्त्याजवळ सोमवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. या अपघाताचे काही फोटो समोर आले आहेत. ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या भयंकर अपघातात सुदैवाने कार चालकाचा जीव बचावला आहे. एक 10 टायर असलेला ट्रक थेट कारवरच पलटी झाला. ट्रकच्या वजनामुळे कार चक्काचुर झाली. या अपघातात कार चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र तो धोक्यातून बाहेर आहे. या अपघातात ट्रक चालक व क्लिनरचाही जीव वाचला आहे. अवघे दोन ते तीन इंच मागे पलटला ट्रक बाऱोली चार रस्त्यावर एकाच दिशेने कार आणि ट्रक जात होते. यादरम्यान ट्रकने कारला ओव्हर टेक केलं. मात्र यादरम्यान ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि तो शेजारून जाणाऱ्या कारवर पलटला. कारमध्ये केवळ ड्रायव्हर होता. ट्रकचं केबिन कार चालकाच्या सीटपासून 2 ते 3 इंच मागे जाऊ पडला. ज्यामुळे चालकाचा जीव वाचला. कारचं छप्पर खाली आल्याने त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. अपघातानंतर त्याला तातडीने 108 एम्ब्युलेन्समधून रुग्णालयात पोहोचविण्यात आलं. हे ही वाचा-मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भयंकर घटना! 24 वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू लोडेड होता ट्रक अपघात झालेला ट्रक सूरतमधील बारडोली येथील आहे. अपघात झाला तेव्हा ट्रक लोडेड होता. अपघातानंतर हायवेवर वाहतूक खोळंबली. पोलिसांनी क्रेन बोलावून ट्रक रस्त्यातून हटवला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Road accident

    पुढील बातम्या