श्रीनगर, 14 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिवसाच्या एक दिवस आधी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावला आहे. जम्मू पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या 4 अतिरेक्यांना (Terrorist) अटक केली आहे. या सर्वांचा 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला करण्याचा कट होता, अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,'जम्मू काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनी मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनाचा कट होता. त्यासाठी वाहनांमध्ये आयडी बसवण्याची या दहशतवाद्यांची योजना होता. या अतिरेक्यांची ओळख पटली आहे. तौसीफ अहमद शाह ऊर्फ शौकत ऊर्फ अदनान, इजहार खान उर्फ सोनू खान, जहांगीर भट्ट आणि मुतिंडर मजूर अशी त्यांची नावं आहेत. यापैकी सोनू खान हा उत्तर प्रदेशचा असून अन्य तीन दहशतवादी जम्मू काश्मीरचे रहिवाशी आहेत. सर्व देशात हल्ला करण्याची त्यांची योजना होती.
हे सर्वजण पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख अतिरेक्यांच्या संपर्कात होते. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याचबरोबर पानीपतच्या रिफायनरीचे फोटो आणि व्हिडीओ पाठवणे, रामजन्मभूमीची रेकी करणे आणि ड्रोनच्या मदतीनं हत्यारांची जुळवाजुळन करणे ही काम त्यांना सोपवण्यात आली होती.
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती राजीनामा देणार, कुटुंबासोबत देश सोडण्याच्या तयारीत
कसा लागला सुगावा?
या दहशतवाद्यांनी ड्रोनच्या मदतीनं पंजाबमधील अमृतसरमध्ये फेकलेली शस्त्र ताब्यात घेतली होती. तसेच पानिपतच्या रिफायरीचा व्हिडीओ देखील तयार केला होता. मात्र पुढील काम करताना ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले. 15 ऑगस्टच्या दिवशी वाहनांमध्ये आयडी फिट करण्याची त्यांची योजना तयार होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Independence day, Jammu kashmir, Terrorist