S M L

नीरव मोदीला दणका, लंडनच्या कोर्टाने नाकारला जामीन

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला 20 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती.

Updated On: Mar 29, 2019 08:58 PM IST

नीरव मोदीला दणका, लंडनच्या कोर्टाने नाकारला जामीन

लंडन, 29 मार्च : पंजाब नॅशनल बँकेचे पैसे बुडवून ब्रिटनमध्ये राहत असलेल्या निरव मोदीला लंडनच्या कोर्टाने दणका दिलाय. निरवला जामीन देण्यास कोर्टाने नकार दिलाय. वेस्टमिंस्टर कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे भारताला यश मिळालं आहे. या निर्णयामुळे त्याच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईला आणखी वेग येणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींना फसवणाऱ्या नीरव मोदीला 20 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच दिवशी कोर्टात हजर केले गेले.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने टाकलेल्या दबावानंतर इंग्लंडने ही कारवाई केली.

भारतीय बँकिंग क्षेत्रात 13 हजार कोटींचा घोटाळा केल्यानंतर नीरव मोदी वर्षभरापूर्वी भारतातून फरार झाला होता. त्यानंतर भारत सरकारकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी विविध स्थरांवर प्रयत्न करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून इंटरपोलनं 2018च्या जुलै महिन्यांत नीरव मोदीच्या नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केली होती.


अटकेच्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 18 मार्च रोजी नीरव मोदीच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीच्या विरोधात हा निर्णय घेतला आहे. 13 हजार कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी लंडनमध्ये अगदी मुक्तपणे फिरत असल्याचा एक व्हिडिओ 'द टेलिग्राफ' या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रानं काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केला होता. तसेच नीरव मोदीला आम्ही शोधलं असून तो 'वेस्ट एन्ड लंडन'मध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा टेलिग्राफनं केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 29, 2019 08:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close