मराठी बातम्या /बातम्या /देश /

Kashmir: 'देशभक्तीच्या भावनांना ठेच लागली', मेहबुबा मुफ्तींविरोधात 3 नेत्यांचं बंडाचं निशाण

Kashmir: 'देशभक्तीच्या भावनांना ठेच लागली', मेहबुबा मुफ्तींविरोधात 3 नेत्यांचं बंडाचं निशाण

Srinagar: Peoples Democratic Party (PDP) President Mehbooba Mufti addresses a press conference, in Srinagar, Saturday, March 23, 2019. (PTI Photo/S Irfan)(PTI3_23_2019_000115B)

Srinagar: Peoples Democratic Party (PDP) President Mehbooba Mufti addresses a press conference, in Srinagar, Saturday, March 23, 2019. (PTI Photo/S Irfan)(PTI3_23_2019_000115B)

'तुमची काही वक्तव्य आणि निर्णय हे आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे पक्षात राहणं आम्हाला शक्य नाही.'

  • Published by:  Ajay Kautikwar
श्रीनगर 26 ऑक्टोबर: PDPच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना त्यांचं राष्ट्रध्वजाबद्दल दिलेलं वक्तव्य चांगलच महागात पडण्याची शक्यता आहे. काश्मीरचं 370वं कलम आणि ध्वज पुन्हा बहाल झाल्याशीवाय मी तिरंगा फडकविणार नाही असं मुफ्ती म्हणाल्या होत्या. त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता त्यांच्या पक्षातूनच त्याविरोधात आवाज निघाला असून तीन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत बंडाचं निशाण फडकवलं आहे. टी.एस बाजवा, वेद महाजन आणि हुसेन वाफा या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. तुमची काही वक्तव्य आणि निर्णय हे आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे देशभक्तीच्या भावनांना ठेच लागली आहे. त्यामुळे पक्षात राहणं आम्हाला शक्य नाही असं या नेत्यांनी मुफ्ती यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. भाजपचेही आंदोलन जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 (Article 370) पुन्हा लागू होईपर्यंत ना निवडणूक लढवणार, ना तिरंगा हातात घेणार' असं म्हणत माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत. महबूबा मुफ्ती यांच्या राष्ट्रध्वजावरील वक्तव्यानंतर भाजप (BJP) कार्यकर्ते नाराज झाले आहेत. महबूबा यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी श्रीनगर ते कुपवाडा तिरंगा यात्रा काढली. एवढंच नाही तर श्रीनगर येथील प्रसिद्ध लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी भाजपच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. महबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी जम्मू येथील पीडीपी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केली. काही तरुणांनी जम्मू येथील पीडीपी कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकावला. यावेळी महबूबा मुफ्ती यांच्याविरोधात जोरदार घोषणावाजी करण्यात आली.
First published:

Tags: Jammu and kashmir

पुढील बातम्या