दिल्ली हिंसाचाराचा मोठा खुलासा; ताहिर हुसेनच्या आरोपपत्रात उमर खालिदच्या नावाचा उल्लेख

दिल्ली हिंसाचाराचा मोठा खुलासा; ताहिर हुसेनच्या आरोपपत्रात उमर खालिदच्या नावाचा उल्लेख

ताहिर हुसेन याने दिल्ली हिंसाचारासाठी कोटींमध्ये खर्च केल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी ताहिरला दिल्ली हिंसाचाराचा सूत्रधार मानले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 जून : दिल्ली पोलिसांच्या एसआयटीच्या गुन्हे शाखेने चांदबाग आणि जाफराबाद हिंसाचार प्रकरणात आज न्यायालयात दोन आरोप-पत्र दाखल केले. यात बरेच मोठे खुलासे झाले आहेत. काही  महिन्यांपूर्वी दिल्लीत हिंसाचार करण्यात आला होता. आम आदमी पार्टी (AAP) मधून हद्दपार करण्यात आलेले माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्याविरोधात आज दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने आरोपपत्र दाखल केले आहे.

पोलिसांनी ताहिर हुसेन यांना चांदबाग हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले आहे. आरोपपत्रात उमर खालिद यांच्या नावाचादेखील उल्लेख आहे. परंतु चांदबाग हिंसाचार प्रकरणात अद्याप त्यांच्यावर कोणतेही आरोप दाखल करण्यात आले नाही. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर खालिद यांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

15 लोकांवर आरोप

दिल्ली पोलिसांनी माजी नगरसेवक ताहिर हुसेन यांच्यासह 15 जणांवर आरोप दाखल केले आहेत. ताहिर हुसेनचा भाऊ शाह आलम यांच्यावरही आरोप ठेवण्यात आला आहे. आरोपपत्र 1030 पानांचे आहे, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, दंगली दरम्यान आरोपी ताहिर हुसेन त्याच्या घराच्या छतावर उपस्थित होता. ताहिर हुसेन यांच्यावर दंगलीचा आरोप आहे. ताहिर हुसेन यांनी दंगल केल्याचा आरोपही केला जात आहे. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान आरोपी ताहिर हुसेन यांनीही दंगलीसाठी एक कोटी 30 लाख रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले.

24 फेब्रुवारी रोजी हिंसाचार झाला

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची एसआयटी येत्या काही दिवसांत अनेकांविरोधात आरोपपत्र दाखल करू शकते. विशेष म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 15 जणांवर आरोप केले आहेत. एसआयटीच्या तपास पथकाने ताहिर हुसेन यांच्या छतावरुन पेट्रोल बॉम्ब आणि मोठ्या प्रमाणात दगड जप्त केले आहे. या हिंसाचाराच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी चांदबाग परिसरातील हिंसाचारात अंकित शर्माचा मृत्यू झाला होता.

10 वेगवेगळ्या प्रकरणात आरोपी आहे ताहिर

ताहिर हुसेन हा दिल्लीतील हिंसाचाराच्या सुमारे 10 वेगवेगळ्या प्रकरणांचा आरोपी आहे. यातील एक प्रकरण म्हणजे आयबी अधिकारी अंकित शर्मा खून प्रकरण. जालना प्रकरणातील आरोपी ताहिर हुसेनविरूद्ध दाखल केलेला हा पहिला आरोपपत्र आहे. चार्जशीटमध्ये 50 हून अधिक साक्षीदारांच्या निवेदनांचा समावेश करण्यात आला आहे. चांदबाग परिसरातील हिंसाचारात ताहिर हुसेन यांच्या घरापासून दगडफेक व जाळपोळ सुरू केल्याचा आरोप करण्यात आला होता.

दिल्ली दंगलीचा आरोपी माजी नगरसेवक ताहिर हुसेन याच्याविरोधात एप्रिलमध्ये यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करतांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ताहिर हुसेनला दिल्लीच्या चांदबाग आणि आयबी अधिकारी अंकित खून प्रकरणातील आरोपी बनवले. दिल्ली दंगलीच्या कट रचल्याचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने ताहिर हुसेनला कोठडीत गुन्हे शाखेतून अटक केली होती आणि नंतर ताहिर हुसेन याला यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये मलायकानं शेअर केला असा Photo की, युजर्सना झाली अर्जुनची आठवण

First published: June 2, 2020, 3:00 PM IST

ताज्या बातम्या