देशातील 1000 नागरिकांच्या धर्मांतराचं कारस्थान आखल्याचा मोठा खुलासा; ISI फडिंगचे पुरावे आले समोर

सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यामध्ये दिव्यांग मुलं आणि महिलांचा समावेश अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यामध्ये दिव्यांग मुलं आणि महिलांचा समावेश अधिक असल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:
    लखनऊ, 21 जून : उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) धर्मांतराच्या कारस्थानाचा मोठा खुलासा झाला आहे. उत्तर प्रदेश एटीएसने (UP ATS) दिल्लीतील जामिया नगरमध्ये राहणाऱ्या दोघांना या प्रकरणात अटक केली आहे. हे दोघे या कारस्थानात सामील होते. एटीएसला धर्मातराच्या कारस्थानामागे पाकिस्तानची (Pakistan) गुप्तहेर संघटना आयएसआयने (ISI) फंडिंग केल्याचे पुरावे मिळाले आहेत. उत्तर प्रदेशात प्लानिग करून केलं जात आहे धर्मांतर उत्तर प्रदेशाचे एडीजी प्रशांत कुमार (लॉ अॅन्ड ऑर्डर) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 2 जून 2021 रोजी डासना स्थित एका मंदिरात दोघांनी अवैधपणे घुसण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींच नाव विपुल विजयवर्गीय आणि काशिफ आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात मोठा प्लान सुरू आहे. याअंतर्गत ठरवून लोकांचं धर्मांतर केलं जात आहे, मोठ्या रकमेचं अमिष दाखवून त्यांच्याकडून धर्मांतर केलं जात आहे. त्यांनी पुढे सांगितलं की,  एक गौतम नावाची व्यक्ती बाटला हाऊस, जामिया नगर येथील राहणारी आहे. त्याने स्वत:ही धर्मांतर केलं आहे. चौकशीनंतर त्याचा साथीदार जहांगीर आलम याला अटक करण्यात आली. ज्यात मिळालेल्या माहितीनुसार, 1000 लोकांना प्रलोभन देऊन, घाबरवून धर्मांतर करण्यात आले. हे ही वाचा-Online देह व्यापार! 20,000 रुपयांत मुली, WhatsApp वर डील; जागा ग्राहकाची! समाजातील मजबूत लोकांवर साधताय निशाणा एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, लखनऊ एटीएसने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एक संस्था आणि अन्य लोकांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधातही केस दाखल करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यामध्ये दिव्यांग मुलं आणि महिलांचा समावेश अधिक आहे. कोणासा संशय येऊ नये यासाठी, महिलांचं धर्मांतर करून त्यांचं लग्न दुसऱ्या धर्मात लावून देण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, नोएडा, मथुरा आणि वाराणसीसह अन्य ठिकाणी धर्मांतर करण्यात आलं आहे. देशातील अन्य भागातही हे रॅकेट चालवलं जात आहे. एक विद्यार्थी आदित्य गुप्ता याचं धर्मांतर करून त्याला दक्षिण भारतातील कोणा राज्यात घेऊन जाण्यात आलं, असा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. मुलगा मूक-बधिर असून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्याने आई-वडिलांना याबाबत सांगितल्याचं समोर आलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: