गिरीशचंद्र मुर्मू यांना मोठी जबाबदारी; जम्मू-काश्मीरनंतर आता देशावर ठेवणार लक्ष

पंतप्रधान मोदींच्या अत्यंत विश्वासू अधिकारी असलेल्या मुर्मूंना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे

पंतप्रधान मोदींच्या अत्यंत विश्वासू अधिकारी असलेल्या मुर्मूंना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे

  • Share this:
    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरचे माजी लेफ्टनंट गवर्नर गिरीश चंद्र मुर्मू यांना नवीन CAG (Comptroller and Auditor General) घोषित करण्यात आले आहे. ज्यावेळी सरकारने त्यांना सीएजी नियुक्त केले होते, त्या दिवशी म्हणजेच एक वर्षांपूर्वी कायद्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरचं विभाजन 2 केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये करण्यात आलं होतं. गिरीशचंद्र मुर्मू यांनी काल जम्मू-काश्मिरच्या नायब राज्यपाल पदावरुन राजीनामा दिला होता. 2019 मध्ये ऑक्टोबरनंतर मुर्मू यांना जम्मू-काश्मिरीच्या उपराज्यपालपदी नियुक्त करण्यात आले होते. काल  नॉर्दन कमांडचे आर्मी कमांडर यांनी मुर्मू यांना बोलावून युनिअर टेरिटरीच्या सुरक्षेबाबत चर्चा केली. सनदी अधिकारी गिरीशचंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मिरच्या नायब राज्यपालपदाची शपथ 2019 मध्ये घेतली. जम्मू-काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल बनणारे मुर्मू हे 1985 च्या तुकडीतील गुजरात श्रेणीचे सनदी अधिकारी आहेत. शिवाय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मुर्मू हे त्यांचे प्रमुख सचिव राहिलेले आहेत. पूर्वी ते केंद्रीय अर्थमंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळत होते. कॅगचं काम- 1 कॅग भारताच्या राज्यघटनेद्वारे स्थापित ऑथॉरिटी आहे. ही सरकारच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर असते. यातून सरकारचं उत्पन्न आणि खर्चावर नजर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. कँगची नियुक्ती देशाच्या राष्ट्रपतींद्वारे होते. शिवाय पदच्युत करण्याची प्रक्रियाही तशीच असते. 2 यात सॅलरी आणि सेवाचे नियम संसदेद्वारा ठरवून दिले जातात आणि नियुक्तीनंतर नुकसान होईल असे बदल केले जात नाहीत. कँगच्या ऑफिस प्रशासनीक खर्च कंसॉलिडेटेड फंड ऑफ इंडियातून काढले जाते. 3 कॅग आपला रिपोर्ट संसद आणि विधानसभेच्या अनेक समिती उदा. पब्लिक अकाऊंट्स कमिटी आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्सला दिले जाते. ही कमिटी रिपोर्टची स्क्रुटनी करते आणि निर्णय घेते. यात सर्व पॉलिसींचं पालन केल्याचा तपास घेतला जातो.
    Published by:Meenal Gangurde
    First published: