Home /News /national /

Corona Virus : कैद्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारांना नव्या सूचना

Corona Virus : कैद्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारांना नव्या सूचना

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी कारागृहातील संख्या कमी करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना दिली आहे

    नवी दिल्ली, 23 मार्च : देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारांना महत्त्वाची सूचना केली आहे. राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी कारागृहातील संख्या कमी करण्याची सूचना सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना दिली आहे. ज्या कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी असलेल्या 7 वर्ष शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कमीत कमी 6 आठवडे पॅरोल द्यावा, अशी सूचना कोर्टाने केली आहे. प्रत्येक राज्याने यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करावी आणि यामध्ये विधी सचिव,  राज्य न्यायिक सेवा प्राधिकरणच्या व्यवस्थापकांचा समावेश असावा, असंही कोर्टाने आपल्या निर्णयात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णं हे राज्यात आढळले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, ठाणे,  कोल्हापूर इथं मध्यावर्ती कारागृह आहे.  राज्यातील सर्व कारागृहाचा कारभार चार विभागांमध्ये वाटून देण्यात आला आहे. यामध्ये पूर्व विभाग- नागपूर, पश्चिम विभाग -पुणे, दक्षिण विभाग -मुंबई, मध्य विभाग- औरंगाबाद असे विभाग करण्यात आले आहे. या विभागातून ज्या त्या भागातील कारागृहाचे प्रशासकीय कामकाज सुरू असते. दरम्यान,  गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढून आता 427वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 89 रुग्ण आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रासह 22 राज्य आणि 80 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचे निर्देश आता केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. तर सरकारच्या नियमांचं उल्लंघन कऱणाऱ्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिले आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या