शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा

शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात मिळणार मोठा दिलासा

बजेटमध्ये शेतकऱ्यांना खास महत्व दिलं जाणार आहे. निवडणुका जवळ आल्याने केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 01 फेब्रुवारी : देशातल्या शेतकऱ्यांनी कमाल केली असून त्यांनी विक्रमी अन्नधान्य पिकवलंय, पण अतिरिक्त झालेल्या अन्नधान्यामुळंच देशात शेतमालाच्या बाजारात मंदी आलीय. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी  काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात काय होतं याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. 'सीएनबीसी टीव्ही18' च्या बिझनेस लिडरशीप समिटमध्ये बोलताना त्यांनी हे संकेत दिलेत. शेतकऱ्यांच्या कष्टांचं मोल सरकारला माहिती असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अमेरिकेत उपचारासाठी गेलेल्या अर्थमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे या समिटमध्ये सहभाग घेतला. ते म्हणाले, "दुष्काळ आणि अतिरिक्त उत्पादन या दोन्ही संकटांमुळं सध्या देशातला शेतकरी संकटात सापडलाय, त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन जास्त झाल्याने मालाचे भाव कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला."

येत्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल अशा मोठ्या घोषणेचे संकेत यावेळी जेटलींनी बोलताना दिले. बजेटमध्ये शेतकऱ्यांना खास महत्व दिलं जाणार असल्यांचही त्यांनी स्पष्ट केलं. तेलंगणाच्या धर्तीवर सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत म्हणून थेट पैसे जमा करण्याच्या योजनेवर विचार करत आहे.

जेटलींना काय झालं?

अरुण जेटली वैद्यकीय उपचारासाठी रविवारी अमेरिकेला गेले आहेत. 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस त्यांना अमेरिकेत राहावं लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आठ महिन्यांपूर्वीच त्यांचं किडणी प्रत्यारोपणाचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मोदी सरकारचा सहावा अर्थसंकल्प नक्की कोण मांडणार याची उत्सुकता निर्माण झालीय.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटलींच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी म्हणाले, " जेटलीजींची प्रकृती ठिक नाही असं कळल्याने मी व्यथीत झालोय. आम्ही दररोज भांडत असू , मात्र या कठिण काळात मी आणि काँग्रेस पार्टी 100 टक्के तुमच्यासोबत आहोत. तुमच्या प्रकतीत सुधारणा होवो अशी सदिच्छा" असं ट्विट करून राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

VIDEO : अखेर होणार संभाजी महाराज आणि सोयराबाईंची भेट

First published: January 18, 2019, 1:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading