नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : येत्या 5 ऑगस्ट रोजी अयोध्येय राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी कोण कोण उपस्थित राहणार याबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अमित शहांसह राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सामील होणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत बराच विरोध केला जात आहे. भूमिपूनाला कोरोना नाही का येणार असा खोचक सवाल अनेक पक्षांच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून कोणताही केंद्रीय मंत्री राममंदिर भूमिपूजनात सहभागी होणार नाही. तर अमित शहा आणि राजनाथ सिंह हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे.
हे वाचा-दिलासा देणारी बातमी! 24 तासांत 51 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात
अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमा पार्श्वभूमीवर दहशतवादी अयोध्येत हल्ला घडवून आणण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला असून अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अयोध्येत प्रवेश करणाऱ्या सर्व गाड्यांची तपासणी करण्यात येत असून सुरक्षा दलाच्या जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. देशभरातून अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राममंदिराबाबत उत्सुकता आहे. अनेकांना या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहण्याची इच्छा असली तरी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर निर्बंध लादण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah