Home /News /national /

ISROची सर्वात मोठी घोषणा! आता खाजगी कंपन्या देखील बनवू शकणार रॉकेट आणि उपग्रह

ISROची सर्वात मोठी घोषणा! आता खाजगी कंपन्या देखील बनवू शकणार रॉकेट आणि उपग्रह

येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतात अंतराळ क्षेत्रामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने अशी घोषणा केली आहे की आता खाजगी कंपन्या देखील रॉकेट आणि सॅटेलाइट बनवू शकतात.

    बेंगळूरू, 25 जून : येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतात अंतराळ क्षेत्रामध्ये मोठा बदल झालेला पाहायला मिळू शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation ISRO)ने अशी घोषणा केली आहे की आता खाजगी कंपन्या देखील रॉकेट आणि सॅटेलाइट बनवू शकतात. इस्रोचे चेअरमन के सिवन (K Sivan) यांनी अशी माहिती दिली की आता अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले आहे. यावर्षी नासाने पहिल्यांदा खाजगी कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळयानाने दोघांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाठवले आहे. इस्रोचे प्रमुख सिवन यांनी अशी माहिती दिली की, आता खाजगी क्षेत्राला रॉकेट आणि उपग्रह तयार करणे तसंच प्रक्षेपण सेवा प्रदान करणे यासारख्या अवकाश प्रक्रियांना परवानगी दिली जाईल. त्यांनी अशी माहिती दिली की, खाजगी क्षेत्र आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा एक हिस्सा बनू शकतात. दरम्यान सिवन यांनी असे देखील सांगितले की, या निर्णयामुळे इस्रोचे काम कमी होणार नाही. इस्रोकडून शोध आणि विकासाचे काम नेहमी सुरू राहील. बुधवारी कॅबिनेटने अतंराळ क्षेत्राशी संबंधित सर्व प्रक्रियांमध्ये खाजगी क्षेत्रांना भागीदारी करण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'या निर्णयामुळे केवळ याच क्षेत्रामध्ये तेजी येईल असे नाही तर भारतीय उद्योग जगभरातील अंतराळ अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकेल. यासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच जागतिक स्तरावर पॉवर हाऊस बनेल' (हे वाचा-CBSC Board Exam 2020 : दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षाचं काय?) (हे वाचा-भारत-चीन संघर्षापाठोपाठ काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती, 2 जणांचा खात्मा) संपादन- जान्हवी भाटकर
    First published:

    पुढील बातम्या