मराठी बातम्या /बातम्या /देश /

मोठी बातमी! TRP बाबत BARC चा महत्त्वाचा निर्णय, 12 आठवड्यांपर्यत न्यूज चॅनल्सच्या रेटिंगला स्थगिती

मोठी बातमी! TRP बाबत BARC चा महत्त्वाचा निर्णय, 12 आठवड्यांपर्यत न्यूज चॅनल्सच्या रेटिंगला स्थगिती

न्यूज चॅनल्सच्या टीआरपीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेचा मुद्दा बनला आहे. कथित टीआरपी स्कॅम (TRP Scam) बाबत अनेकांना लक्ष्य केले जात आहे. अशावेळी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल अर्थात BARC ने मोठा निर्णय घेतला आहे.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : न्यूज चॅनल्सच्या टीआरपीचा मुद्दा सध्या देशभरात चर्चेचा मुद्दा बनला आहे. कथित टीआरपी स्कॅम (TRP Scam) बाबत अनेकांना लक्ष्य केले जात आहे. अशावेळी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल अर्थात BARC ने मोठा निर्णय घेतला आहे. टीव्ही रेटिंग्स जारी करणारी ही संस्था सध्या बातम्यांच्या वाहिन्यांचे साप्ताहिक रेटिंग जारी करणार नाही आहे. टीआरपीसंदर्भातील घोटाळ्याचे प्रकरण सध्या न्यायालयामध्ये आहे. बीएआरसी बोर्डाने 12 आठवड्यांसाठी रेटिंग्ज जारी न करण्याचा निर्णय घेतला आङे. बीएआरसी बोर्डाने प्रस्ताव दिला आहे की त्यांची टेक्निकल कमिटी सध्या असणाऱ्या स्टँडर्ड्सचे  पुनरावलोकन करेल. सध्याची सिस्टिम आणखी चांगली करण्याचा यामागे हेतू आहे. यामध्ये सर्व हिंदी, प्रादेशिक, इंग्रजी बातम्या आणि बिझनेस न्यूज चॅनल्सचा समावेश असेल. याकरता 8 ते 12 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. BARCच्या या महत्त्वाच्या निर्णयाचे नॅशनल ब्रोडकार्स्टर्स असोसिएशन (NBA) ने स्वागत केले आहे. एनबीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी असे म्हटले आहे की, असा महत्त्वाचा निर्णय घेताना बीएआरसीने त्यांच्याकडून सल्ला घेणे आवश्यक होते. (हे वाचा-मोदींनी दिली त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती, वाचा PM कुठे करतात गुंतवणूक?) बीएआरसीच्या टेक्निकल कमिटीच्या पर्यवेक्षणाअंतर्गत व्हॅलिडिएशन आणि टेस्टिंग केले जाणार आहे. बीएआरसी न्यूज चॅनल्सचे राज्य आणि भाषेनुसार Weekly Audience Estimate जारी ठेवेल. (हे वाचा-2 दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा दिवाळीपर्यंत किंती कमी होणार किंमत) BARC चे  चेअरमन पुनीत गोएंका यांनी या निर्णयाचे काय महत्त्व आहे हे सांगितले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अगदी अलिकडीच्या घडामोडी लक्षात घेता, बीएआरसी बोर्डाचे मत होते या निर्णयाची गरज होती. कारण इंडस्ट्री आणि बीएआरसीने आधीपासूनच्या कडक प्रोटोकॉलचा आढावा घेण्यासाठी बारकाईने काम करणे गरजेचे  आहे. तसंच उद्योगाच्या वाढीसाठी आणि चांगल्या स्पर्धात्मकतेसाठी सहयोग करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे आवश्यक आहे.' काय आहे टीआरपी घोटाळा? मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार यंत्रणेमध्ये काही वाहिन्यांकडून रेटिंगबाबत बनावटपणा सुरू होता. ज्या घरांमध्ये टीआरपी मीटर बसविण्यात आले आहेत त्यांना पैसे देऊन चॅनल सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होते. याचा परिणाम असा झाला की, बीएआरसीच्या साप्ताहिक रेटिंगवर महत्त्वपूर्ण परिणाम दिसला. परंतु, ज्या चॅनल्सचे नाव यामध्ये समोर आले आहे, त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या चॅनल्सनी केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या