Home /News /national /

मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात लढताना 5 जवानांना वीरमरण; 12 जणं जखमी

मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात लढताना 5 जवानांना वीरमरण; 12 जणं जखमी

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 12 जवान जखमी झाले असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

    छत्तीसगड, 3 एप्रिल : एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असता दुसरीकडे नक्षलवाद्यांकडून हल्ले सुरूच आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील बिजापुर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान (CRPF) आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवान आहे. या चकमकीत 12 जवान जखमी झाले असून जखमी जवानांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छत्तीसगडच्या जंगलात माओवाद्याच्या हल्ल्यात पाच जवान शहीद आणि काही जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या चकमकीत एक माओवादी ठार झाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापुर जिल्हयात जुनागडच्या जंगलात गेल्या दोन तासांपासून सुरक्षा दलाचे जवान आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू आहे. बिजापुर आणि सुकमा जिल्हयाच्या सीमेवर ही चकमक अजुनही सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. हे ही वाचा-भारताच्या हद्दीत घुसला पाकिस्तानी मुलगा, BSF नं आधी जेवू घातलं आणि मग.... बातमी अपडेट होत आहे...
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Chattisgarh, Naxal Attack

    पुढील बातम्या